दिलासा; इचलकरंजी विभागातील 'इतके' कृषिपंपधारक झाले थकबाकीमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 20:05 IST2021-11-20T20:04:08+5:302021-11-20T20:05:16+5:30
कोल्हापूर : महावितरणच्या इचलकरंजी विभागातील अब्दुललाट शाखेतील ४५ कृषिपंपधारक शेतकरी ११ लाख १८ हजार रुपयांचे थकीत वीजबिल एकरकमी भरून ...

दिलासा; इचलकरंजी विभागातील 'इतके' कृषिपंपधारक झाले थकबाकीमुक्त
कोल्हापूर : महावितरणच्या इचलकरंजी विभागातील अब्दुललाट शाखेतील ४५ कृषिपंपधारक शेतकरी ११ लाख १८ हजार रुपयांचे थकीत वीजबिल एकरकमी भरून थकबाकीमुक्त झाले आहेत. कृषी धोरणांतर्गत ५० टक्के अनुदानाचा लाभ घेतल्याबद्दल या शेतकऱ्यांचा कोल्हापूर परिमंडलाचे अधीक्षक अभियंता अंकूर कावळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कृषिपंपातील थकबाकी वसुली करण्याच्या उद्देशाने गेल्यावर्षीपासून थकबाकीचा भरणा केल्यास ५० टक्के माफी देण्याचे नवे कृषी धोरण जाहीर झाले. याचा लाभ शेतकरी घेत आहेत. यासंदर्भात महावितरणकडून मेळावे घेऊन शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे. शुक्रवारी अब्दुललाट शाखेंतर्गत येणाऱ्या लाटवाडी, शिरदवाड, शिवनाकवाडी या गावांतील ४५ शेतकऱ्यांनी पहिल्याच टप्प्यात लाभ घेतला. आतापर्यंत या योजनेचा या शाखेतील ११९२ शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.
थकबाकीनिमित्त घेतलेल्या मेळाव्याला इचलकरंजी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी, उपकार्यकारी अभियंता सुनील आकीवाटे, सुभाष बिरनाळे, लिपिक दगडू हंकारे, शाखा अभियंता शिवराज पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.