शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

'ते' पक्षाचा अपमान करीत आहेत की काय?, मंत्री मुश्रीफांचा घाटगेंना खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2023 12:23 PM

सरसेनापतीला युद्धनीती, डावपेच माहीत असतात

कागल : मंत्री हसन मुश्रीफ हे लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचे सरसेनापती होते. सरसेनापतीला युद्धनीती, डावपेच माहीत असतात. महत्त्वाचे म्हणजे चक्रव्यूहातून बाहेर कसे पडायचे, हे माहीत असायला हवे असते. मंत्री मुश्रीफ यांना हे जमले आहे. ते जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहेत. आता त्यांनी आम्ही असू अथवा समरजित घाटगे असूदेत आम्हा सर्वांना बरोबर घेऊन जावे. आमचे पालकत्व निभवावे, असे प्रतिपादन खासदार संजय मंडलिक यांनी केले.मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच माजी आमदार संजय घाटगे पराभूत होऊनही मुश्रीफांच्या सत्काराला गैबी चौकात हजर राहिले होते. आज मात्र बदलत्या राजकीय घडामोडीने खा. मंडलिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.आजची सभा विधानसभेच्या निवडणुकीची सभा आहे का, अशी भाषणे झाली; पण शेवटी कार्यकर्ता जगण्यासाठी राजकीय ईर्षा हवीच. आमची आणि मंत्री मुश्रीफांची जिल्हा परिषद निवडणुकीपासून एकत्र सुरुवात आहे. वरची राजकीय स्थिती काहीही असली तरी आम्ही विकासकामाच्या विषयावर एकत्रच राहिलो आहोत. आता आम्ही महायुतीचे घटक बनलो आहोत. दुप्पट वेगाने जिल्ह्याचा विकास करू, असेही मंडलिक म्हणाले.

ते पक्षाची बदनामी करीत आहेत. मंत्री मुश्रीफदरम्यान सत्कार सोहळा झाल्यानंतर पत्रकारांनी समरजित घाटगे यांच्या भूमिकेबद्दल विचारले तेव्हा मंत्री मुश्रीफ म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांनी चर्चा करून हे महायुतीचे सरकार बनविले आहे. मग समरजित घाटगे हे स्वतः जिल्हाध्यक्ष असूनही आपल्या वरिष्ठ नेत्यांची बदनामी कशी काय करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगे