सर्पदंश बनतोय जीवघेणा..प्रमाणात वाढ : अडगळीच्या ठिकाणी जपून; शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी
By Admin | Updated: July 14, 2014 01:03 IST2014-07-14T00:42:00+5:302014-07-14T01:03:03+5:30
वेगाने सर्पदंशाचे रुग्णही वाढत आहेत

सर्पदंश बनतोय जीवघेणा..प्रमाणात वाढ : अडगळीच्या ठिकाणी जपून; शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी
गणेश शिंदे - कोल्हापूर
सध्या सर्वत्र शेतीकामांना वेग आला आहे. तितक्याच वेगाने सर्पदंशाचे रुग्णही वाढत आहेत. अडगळ, किचकटीच्या ठिकाणी स्वत:ला जपा, अन्यथा नजरचुकीने जरी सर्पाला स्पर्श अथवा इजा झाल्यास तो दंश करू शकतो. विशेषत: शेतकरी, शेतमजूर, गुराखीबांधवांनी याची दक्षता घेणे गरजेचे आहे. गेल्या १५ दिवसांत शासकीय रुग्णालयात दिवसाकाठी सर्पदंशाचे सात ते आठ रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत.
एखाद्याचा मृत्यू झाल्यास
वारसांना मिळते शासकीय मदत...
राज्य सरकारने शेतकरी जनता अपघात विमा योजना सुरू केली आहे. सर्पदंशाने दगावलेल्यांना एक लाख रुपये दिले जातात, तर अवयव निकामी झाला तर ५० हजार रुपये मिळतात.
या योजनेत सर्पदंशासह विजेच्या धक्क्याने मृत्यू, अपघातात मृत्यू, विंचू दंशाने मृत्यू, पाण्यात बुडून मृत्यू, आदींना ही मदत पुणे येथील कृषी आयुक्तालयामार्फत मुंबईतील अल्मंड इन्श्युरन्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने टाटा एआयजी ही कंपनी देते.
सर्पदंशात दगावलेल्या व्यक्तीच्या दहा ते ७५ वयोगटांतील वारसांना ही मदत मिळते; पण त्यासाठी वारसांचे नाव ८ अ (प्रॉपर्टीवर नाव) आवश्यक असते. मृत पुरुष असेल तर त्याच्या पत्नीला, तसेच पत्नी नसेल तर प्रथम वारसाला (थोरला मुलगा अथवा मुलगी) ही मदत मिळते. जिल्ह्यात
सात लाख (अंदाजे) असे ‘८ अ’चे नोंद आहे.
घटनास्थळाचा पोलिसांचा पंचनामा, प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर), तलाठी सात/बारा, ‘८ अ’, ६ ड, (तो शेतकरी कसा झाला), ६-क (वारस कोण), शवविच्छेदन अहवाल (पी.एम.)