शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

Crime News: औषधसाठा असल्याचे भासवून मद्याची तस्करी, कोल्हापुरात कंटेनरसह ४५ लाखांचा मद्यसाठा जप्त

By तानाजी पोवार | Updated: July 25, 2022 16:24 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

कोल्हापूर : औषध साठा असल्याचे भासवून गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी करणारा कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभागाने राष्ट्रीय महामार्गावर गांधीनगर फाट्याजवळ पकडला. कारवाईत कंटेनरसह मद्य असा सुमारे ४४ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई काल, रविवारी रात्री उशिरा करण्यात आली.याप्रकरणी वाहनचालक अनिल भाऊसाहेब कदम (वय ३३ रा. जालना रोड, बीड, ता. गोवराई, जि. बीड) याला ताब्यात घेऊन त्याच्यावर दारुबंदी अधिनियमान्वये गुन्हा नोंद केला आहे.उचगाव हद्दीतून बेकायदेशीररीत्या गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी कंटेनरमधून होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे व उपअधीक्षक राजाराम खोत यांना मिळाली. त्यानुसार भरारी पथकाने राष्ट्रीय महामार्गावर गांधीनगर फाटा येथे सापळा रचला. यावेळी संशयास्पद कंटेनरला थांबवून पथकाने चौकशी केली. चालकाने कंटेनरमध्ये औषधसाठा असल्याचे सांगितले. मात्र अधिक तपासणी केली असता कंटेनरमध्ये गोवा बनावटीचा मद्यासाठा आढळून आला. यावेळी सुमारे ४४ लाख ८५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई हातकणंगले निरीक्षक संभाजी बरगे, कागल सीमा तपासणी नाकाचे निरीक्षक जगन्नाथ पाटील, दुय्यम निरीक्षक बबन पाटील, शीतल शिंदे, सहायक निरीक्षक आनंद वाघमारे, जवान सचिन लोंढे, अनिल दांगट, बालाजी गिड्डे, राहुल संकपाळ, योगेश शेलार यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी