किरकोळ स्वरूपाच्या त्रुटीवगळता परीक्षा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 14:48 IST2020-10-30T14:46:10+5:302020-10-30T14:48:33+5:30
Shivaji University, online, exam, kolhapurnews शिवाजी विद्यापीठाच्या विविध शाखेच्या अंतिम वर्षाच्या शेवटच्या सत्राच्या परीक्षेच्या गुरुवारी तिसऱ्या दिवशी किरकोळ त्रुटीवगळता परीक्षा सुरळीत पार पडल्या. बी.पी.एड्. मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीतून, तर सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना लॉगआऊटला सामोरे जावे लागले. त्यात ४४ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन, तर ८ हजार ३४९ जणांनी ऑफलाईन परीक्षा दिली.

किरकोळ स्वरूपाच्या त्रुटीवगळता परीक्षा सुरळीत
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विविध शाखेच्या अंतिम वर्षाच्या शेवटच्या सत्राच्या परीक्षेच्या गुरुवारी तिसऱ्या दिवशी किरकोळ त्रुटीवगळता परीक्षा सुरळीत पार पडल्या. बी.पी.एड्. मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीतून, तर सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना लॉगआऊटला सामोरे जावे लागले. त्यात ४४ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन, तर ८ हजार ३४९ जणांनी ऑफलाईन परीक्षा दिली.
सकाळच्या पहिल्या सत्रात ११ ते १२ या कालावधीत बी.ई., एम.एम.स्सी, बी.एस्सी, एम.एसडब्ल्यू, बी.व्होक, एम.बी.एम., तर दुसऱ्या सत्रात एम.पी.डीय, बी.टेक, बी.फार्म, एम.एमस्सी, एम.बी.ए, बी.ए, बीसीए, बीबीए, बी.कॉम., तर तिसऱ्या सत्रात बी.टेक्स, बी.फार्म, एम.एड या अभ्यासक्रमाच्या परीक्षा झाल्या. या परीक्षांसाठी एकूण ४५ हजार १४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४४ हजार १३३ जणांनी ऑनलाईन पद्धतीने, तर १ हजार ७ विद्यार्थी गैरहजर राहिले. ऑफलाईन पद्धतीने ८ हजार ३४९ जणांनी परीक्षा दिली.
सकाळच्या सत्रात बी.ई. सिव्हीलच्या पेपर दरम्यान लॉगआऊट होऊ लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. त्यांच्याकरीता पेपरची वेळ वाढवून देण्यात आली. एम.पीएड्.च्या पेपरदरम्यान मराठी भाषेऐवजी इंग्रजी भाषेतील पेपर पुरविण्यात आले. या दोन्ही त्रुटींचे विद्यापीठ प्रशासनातर्फे तत्काळ निराकरण करण्यात आले.