शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

महापूर, कोरोनावेळी मदतीचा हात देणाऱ्यांचा स्मॅकडून सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 6:04 PM

business Kolhapur-महापूर, वादळ आणि कोरोना संकटावेळी आरोग्य सुविधा आणि साधनांचा पुरवठा, कामगारांना पाठबळ, आदी स्वरूपात मदतीचा हात देणाऱ्यांचा शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक)कडून स्मॅक सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. यामध्ये उद्योजक, महावितरणचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

ठळक मुद्देउद्योजक, महावितरण, पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश वार्षिक सभेनिमित्त आयोजन

कोल्हापूर : महापूर, वादळ आणि कोरोना संकटावेळी आरोग्य सुविधा आणि साधनांचा पुरवठा, कामगारांना पाठबळ, आदी स्वरूपात मदतीचा हात देणाऱ्यांचा शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक)कडून स्मॅक सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. यामध्ये उद्योजक, महावितरणचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.स्मॅकच्या ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त केशवराव भोसले नाट्यगृहात प्रेरणादायी वक्ते आणि शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते मानपत्र, शाल, कापडी पुष्पगुच्छ देऊन संकट काळात मदत करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, उद्योजक रामप्रताप झंवर, चंद्रशेखर डोली, दीपक आणि भरत जाधव, सचिन आणि सोहन शिरगावकर, महेंद्र आणि प्रकाश राठोड, पद्माकर आणि शिरीष सप्रे, सुनील जनवाडकर, सुरेंद्र जैन, तुकाराम पाटील, दीपक परांडेकर, प्रमोद पाटील, शेखर कुसाळे, राजेंद्र चौगुले, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले, प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी प्रवीण गिल्डा, महावितरणचे सहायक अभियंता संदीप गावडे यांचा सत्कार करण्यात आला.

यानंतर इंद्रजित देशमुख यांनी उद्योजकता व कुटुंब व्यवस्था या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला राजू पाटील, जयदीप चौगले, एम. वाय. पाटील, सचिन पाटील, नीरज झंवर, अमर जाधव, श्यामसुंदर तोतला, जयदत्त जोशीलकर, आदी उपस्थित होते. स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष दीपक पाटील यांनी आभार मानले.सृजनशीलता, संवादाचा संस्कार आवश्यकजुन्या पिढीने अनुभवातून उद्योग उभारला. त्यामध्ये सध्या दुसरी पिढी योगदान देत आहे. शिक्षणानंतर तिसरी पिढी थेट उद्योगात येत आहे. त्यामुळे राहात असलेला ह्यनॉलेज गॅपह्ण दूर करण्यासह आपल्या पाल्याला चांगला उद्योजक घडवायचे असेल, तर त्याच्यावर सृजनशीलता, संवाद कौशल्य, इतरांना मदतीचा हात देण्याचे संस्कार रूजविणे आवश्यक असल्याचे इंद्रजित देशमुख यांनी सांगितले.

आपल्याकडील माहितीचे ज्ञानात आणि ज्ञानाचे रूपांतर दृष्टीमध्ये व्हावे. ९५ टक्के प्रेम आणि ५ टक्के क्रोध या तत्वाने पाल्यांना घडवावे. पाल्यांमधील गुण, क्षमता ओळखून त्यांना ते देण्याची जबाबदारी पालकांनी पार पाडावी, असे सांगितले. 

टॅग्स :businessव्यवसायkolhapurकोल्हापूर