शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

बिनधास्त करा थर्टीफर्स्टची पार्टी, मद्य पिण्याचा परवाना काढा..कारवाई टाळा; देशी-विदेशीच्या परवान्यासाठी 'इतका' दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 14:16 IST

मद्य प्राशन करण्याचा परवाना सोबत असेल तर पोलिसांच्या कारवाईची चिंता नसते.

कोल्हापूर : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जल्लोषी पार्टीची तयारी करीत असाल तर सावधान. कारण मद्यपींना मद्य प्राशन करण्याचा परवाना बंधनकारक आहे. ३१ डिसेंबरची गरज लक्षात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात ६० हजार परवाने विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. त्यामुळे परवाना घेऊनच पार्टीचा बेत केल्यास आनंदावर विरजन पडणार नाही.३१ डिसेंबर म्हटले की अनेकांचा रंगीत-संगीत पार्टीचा बेत ठरलेला असतो. बार, रेस्टो यासह फार्महाऊस आणि काही घरांमध्ये ही रात्री उशिरापर्यंत पार्ट्या रंगतात. अशावेळी मद्य प्राशन करण्याचा परवाना सोबत असेल तर पोलिसांच्या कारवाईची चिंता नसते. मात्र विना परवाना मद्य प्राशन केल्यानंतर पोलिसांच्या कारवाईत सापडले तर रंगाचा बेरंग होण्याचा धोका असतो. त्यामुळे ३१ डिसेंबरसाठी दारू पार्टी करणाऱ्यांनी परवाना घेऊनच मद्य खरेदी करावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

जिल्ह्यात ३१ डिसेंबरला ६० हजार परवाने विक्रीसाठी उपलब्ध केल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांनी सांगितले. देशी दारू पिणाऱ्यांसाठी एक दिवसाच्या परवान्याचे दोन रुपये द्यावे लागतील, तर विदेशी पिणाऱ्यांसाठी पाच रुपये द्यावे लागणार आहेत. सर्व वाईन शॉप आणि बिअर बारमध्ये परवाने विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. मद्य विक्री करतानाच विक्रेत्यांकडून ग्राहकांना परवाने दिले जाणार आहेत. परवाने विक्रीतून राज्याच्या तिजोरीत महसुलाची भर पडणार आहे.

ऑनलाइन ही परवाने उपलब्धमद्य प्राशन करण्याचे परवाने ऑनलाइन ही उपलब्ध आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेतस्थळावरून डिजिटल सहीचे परवाने दिले जातात. त्यासाठी ग्राहकांना स्वत: चा फोटो असलेले ओळखपत्र आणि निवासाचा पुरावा अपलोड करावा लागतो. त्यामुळे आता घरबसल्या ही मद्य प्राशनाचे परवाने घेऊ शकता.

परवाने घेण्यात निरुत्साहगेल्यावर्षी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात ५० हजार परवाने विक्रीसाठी उपलब्ध केले होते. मात्र त्यापैकी केवळ २३ ते २४ हजार परवान्यांची विक्री झाली होती. विना परवाना मद्य प्राशन केल्याचे आढळल्यास १०० ते ५०० रुपयांचा दंड होऊ शकतो, त्यामुळे परवाने घेऊनच मद्य प्राशन करावे, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

परवाने आणि दरएक दिवस - देशी- २ रुपये, विदेशी ५ रुपयेवर्षभरासाठी - १०० रुपयेआजीवन - १००० रुपये 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNew Yearनववर्षalcohol prohibition actदारुबंदी कायदाPoliceपोलिस