शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

क्षीरसागर यांच्यासह सहा आमदारांची उमेदवारी पक्की, शिवसेनेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 1:47 PM

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरसह जिल्ह्यातील सहाही विद्यमान आमदारांची येत्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी शिवसेनेने निश्चित केली. या मतदारसंघातून त्यांनाच उमेदवारी ...

ठळक मुद्देक्षीरसागर यांच्यासह सहा आमदारांची उमेदवारी पक्कीशिवसेनेचा निर्णय :चंदगड, कागलमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरसह जिल्ह्यातील सहाही विद्यमान आमदारांची येत्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी शिवसेनेने निश्चित केली. या मतदारसंघातून त्यांनाच उमेदवारी देण्याचे निश्चित असल्याने कुणाच्या मुलाखतीही झाल्या नाहीत. उर्वरित चारपैकी चंदगड व कागल मतदारसंघांतून उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच आहे.कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी बदलणार, हा मतदारसंघ भाजप आपल्याकडे घेऊन तेथून पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे निवडणूक लढवणार अशी गेली अनेक दिवस चर्चा होती; परंतु तसा कोणताही बदल होणार नाही; कारण पक्षाने त्यांची उमेदवारी निश्चित केली आहे. या मतदारसंघातून जिल्हाप्रमुख संजय पवार हेदेखील इच्छुक होते; परंतु त्यांनाही पक्षाकडून आमदार क्षीरसागर यांच्या उमेदवारीबद्दल संकेत मिळाल्याने मुलाखत दिली नाही; तथापि त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीबद्दलचे एक पत्र पक्षनेतृत्वाला दिले.त्यामध्ये मुख्यत: शहरातील पक्ष संघटनेत काय पद्धतीने राजकारण सुरू आहे याची माहिती दिली असल्याचे समजते.

अन्य कोणत्या मतदारसंघातील आमदारांची उमेदवारी बदलण्याची मागणी अथवा चर्चा नव्हतीच. त्यामुळे त्यांचाही मार्ग मोकळा झाला. उत्तर शिवाय करवीर मतदारसंघातून आमदार चंद्रदीप नरके, राधानगरीतून आमदार प्रकाश आबिटकर, शाहूवाडीतून आमदार सत्यजित पाटील, हातकणंगलेमधून आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि शिरोळमधून आमदार उल्हास पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली. त्याची पक्षाच्या वतीने येत्या काही दिवसांत अधिकृत घोषणा होईल.मुंबईत बुधवारी शिवसेना भवनमध्ये पक्षाच्या वतीने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई, खासदार डा.ॅ श्रीकांत शिंदे, विश्वनाथ नेरुडकर, अमोल कीर्तिकर आणि आमदार मनीषा तार्इंगडे यांनी या मुलाखती घेतल्या.

कागलमधून माजी आमदार संजय घाटगे यांनी मुलाखत देऊन या जागेवर शिवसेनेचाच हक्क असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवारास तब्बल एक लाख ४८ हजार मते मिळाली असून, या मतदारसंघातून पक्षाच्या उमेदवारास जिंकण्याची जास्त खात्री असल्याने हा मतदारसंघ शिवसेनेतर्फेच लढवावा, अशी मागणी घाटगे यांनी केली.कुणी मागितली उमेदवारी

  • चंदगड : संग्राम कुपेकर, सुनील शिंत्रे, प्रभाकर खांडेकर, अनिरुद्ध रेडेकर, रियाज समंजी आणि विजय देवणे
  • कागल : संजय घाटगे, अंबरीश घाटगे, संभाजी भोकरे
  • कोल्हापूर दक्षिण : सुजित चव्हाण, राजू यादव व विराज पाटील
  • इचलकरंजी : महादेव गौड, नगरसेवक रवींद्र माने

देवणेही चंदगडमधून इच्छुकगेल्या निवडणुकीत विजय देवणे हे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून लढले होते. यावेळेला हा मतदार संघ युतीमध्ये भाजपला जाणार हे माहीत असल्याने त्यांनी चंदगड मतदारसंघातून उमेदवारी मागितली. या मतदारसंघातून लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीपासून सातत्याने शिवसेनेला मताधिक्यांची चढती कमान आहे. त्यामुळे हा मतदार संघ शिवसेनेच्याच वाट्याला येणार हे नक्की समजून त्यांनी उमेदवारी मागितली आहे. राजेश नरसिंगराव पाटील यांनी उमेदवारीच न मागितल्याने ते शिवसेनेतून लढणार नाहीत, हे स्पष्ट झाले. 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाShiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर