सिंगलसाठी सिंगलसाठी सिंगलसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:07 IST2021-02-05T07:07:45+5:302021-02-05T07:07:45+5:30
गडहिंग्लज : शहरातील कुंभार गल्लीतील श्री महालक्ष्मी मंडळातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या (मंगळवारी) सकाळी १० वाजता खुल्या रांगोळी स्पर्धा, तर ...

सिंगलसाठी सिंगलसाठी सिंगलसाठी
गडहिंग्लज : शहरातील कुंभार गल्लीतील श्री महालक्ष्मी मंडळातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या (मंगळवारी) सकाळी १० वाजता खुल्या रांगोळी स्पर्धा, तर सायंकाळी ५ वाजता कुंभार गल्लीत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे, अशी माहिती सागर कुंभार यांनी दिली.
-----------------------------
२) मूकबधिर विद्यार्थ्यांना फळे वाटप
गडहिंग्लज : हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील शिवसेना कार्यकर्त्यांनी निवासी मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना फळे वाटली. यावेळी हणमंतराव साठे, काशीनाथ गडकरी, अशोक खोत, सचिन प्रसादे, हालाप्पा भमानगोळ, दिगंबर पाटील, महादेव पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
-----------------------------
३) ‘ओंकार’मध्ये सोमवारपासून मोफत प्रशिक्षण
गडहिंग्लज : येथील ओंकार शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि कै. आर. वाय. देशपांडे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने १ फेब्रुवारीपासून मोफत स्पर्धा परीक्षा केंद्रांतर्गत पोलीस भरती प्रशिक्षण देण्यात येणार आहे. देशसेवेचे स्वप्न बाळगणाऱ्या सीमाभागातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्र. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांनी केले आहे.
--------------------------------------
४) गडहिंग्लजच्या धावपट्टूंची निवड
गडहिंग्लज : येथील न्यू शिवराज अॅथेलिट अकॅडमीचे ५ विद्यार्थी ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इंडियातर्फे सिंथेटिक ट्रॅक कोल्हापूर येथील धावणे स्पर्धेत उज्ज्वल यश मिळविले. त्यांची पुणे (भोसरी) येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये सुकन्या शिवणे, भक्ती पोटे, पायल मोरे, गायत्री पाटील व रोहन कसेरकर यांचा समावेश आहे.