सिंगल बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:20 IST2021-04-14T04:20:58+5:302021-04-14T04:20:58+5:30
गडहिंग्लज : येथील शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी लिहिलेल्या 'स्वयंसिद्धा महाराणी कैकयीची कैफियत' या पौराणिक ...

सिंगल बातम्या
गडहिंग्लज : येथील शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी लिहिलेल्या 'स्वयंसिद्धा महाराणी कैकयीची कैफियत' या पौराणिक कादंबरी व 'सत्यशोधक महात्मा बसवेश्वर' या संशोधनात्मक चरित्रग्रंथ अशा दोन पुस्तकांचे प्रकाशन ऑनलाईन झाले. शिक्षणमंत्री उदय सामंत व शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन झाले.
यावेळी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, शिवलिंगेश्वर महास्वामीजी, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. कौतिकराव ठाले-पाटील, आदी उपस्थित होते.
--------------------------
२) सुरेखा कुंभार विद्यापीठात द्वितीय
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयाची विद्यार्थिनी सुरेखा तानाजी कुंभार हिने एम.ए. या पदव्युत्तर पदवी परीक्षेत हिंदी विषयात ८२ टक्के गुण मिळवून शिवाजी विद्यापीठात द्वितीय, तर भाषामध्ये चतुर्थ क्रमांक पटकाविला. तिला डॉ. सुधीर मुंज, प्रा. एन. बी. एकिले, डॉ. एस. बी. माने यांचे मार्गदर्शन लाभले.
--------------------------
३) 'शिवराज'मध्ये म. गांधीजींना अभिवादन
गडहिंग्लज : शहरातील शिवराज महाविद्यालयात समाजशास्त्र विभागातर्फे महात्मा जोतिराव फुले यांची जयंती साजरी झाली. प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते. कुराडे यांनी फुलेंच्या सामाजिक व वैचारिक कार्याचा आदर्श व वारसा याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी सचिव अनिल कुराडे, एस. डी. सावंत, तानाजी पाटील, संतोष शहापूरकर, आर. पी. हेंगडे यांनी प्रास्ताविक केले.
--------------------------
४) संदेश कुरळे याला टेनिसमध्ये अजिंक्यपद
गडहिंग्लज : शहरातील साधना वाणिज्य महाविद्यालयाच्या संदेश दत्तात्रय कुरळे याने इंदोर (मध्य प्रदेश) येथे झालेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले. संस्था सचिव प्रा. जे. बी. बारदेस्कर यांच्या हस्ते त्याचा सत्कार झाला. यावेळी प्राचार्य जी. एस. शिंदे, पर्यवेक्षक रफिक पटेल, क्रीडाशिक्षक विनय नाईक, संचालक अरविंद बार्देस्कर, अनिता पोवार, आदी उपस्थित होते.