शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: हुपरीतील चांदी व्यावसायिकाचा खून, १५ लाखांच्या चांदीसह दागिने लंपास; संशयित भाऊ ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 11:43 IST

हल्लेखोरांनी दुपारी घरी कोणीही नसल्याचे पाहून त्यांच्यावर धारदार शस्त्राने चार वर्मी घाव घालून निर्घृणपणे खून केला

हुपरी : येथील तरुण चांदी व्यावसायिक ब्रह्मनाथ सुकुमार हालुंडे (वय ३१ रा. सिल्व्हर झोन वसाहत हुपरी) यांचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याचे रविवारी सायंकाळी उघडकीस आले आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरीच घडली. यावेळी हल्लेखोरांनी कपाटातील सुमारे १५ लाख रुपये किमतीची चांदी व चांदीचे दागिनेही लंपास केले.याप्रकरणी भाऊ प्रवीण सुकुमार हालुंडे याला संशयित म्हणून हुपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली असून हुपरी व गोकुळ शिरगाव पोलिस या खुनाचा तपास करीत आहेत. महिन्याच्या कालावधीत दुसरा खून झाल्याने खळबळ उडाली आहे.याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून समजलेली माहिती अशी. चांदी व्यावसायिक ब्रह्मनाथ हालुंडे हे पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील सिल्व्हर झोन वसाहतीमध्ये आई- वडिलांसह वास्तव्यास होते. परपेठेतील सराफांच्या मागणीनुसार चांदी दागिने बनवून घेऊन पोहोच करण्याचा त्यांचा व्यवसाय होता. ते अविवाहित असून धार्मिकवृतीचे होते. आई-वडिलांसह ते एकत्रित राहात असले तरीही त्यांचा चांदी व्यवसाय स्वतंत्र होता. त्यांचे मुळगाव जैनवाडी (ता. निपाणी) असून त्यांच्या शेतातील भुईमूग काढणी सध्या सुरू आहे. त्यामुळे आई-वडील शनिवारपासून तिकडे गेल्याने दोन दिवसांपासून ते घरी एकटेच होते.या संधीचा गैरफायदा घेत अज्ञात हल्लेखोरांनी दुपारी घरी कोणीही नसल्याचे पाहून त्यांच्यावर धारदार शस्त्राने चार वर्मी घाव घालून निर्घृणपणे खून केला. त्यांच्या छातीत खोलवर दोन व मानेवर दंडावर असे घाव घालण्यात आले होते. हल्लेखोरांनी जाताना तिजोरीतील सुमारे १५ लाख रुपये किमतीची चांदी व चांदीचे दागिने लंपास करीत दोन्ही खोलीतील साहित्यही अस्ताव्यस्तपणे विस्कटले आहे.

आई-वडील परतल्यावर खून उघडकीसमुनीश्री आर्षकीर्तीजी महाराज यांचा ४५ वा वर्षवर्धन हा धार्मिक सोहळा रविवारी यळगूड (ता. हातकणंगले) येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये ब्रह्मनाथ हालुंडे हे सकाळी १० पासून सहभागी झाले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी जेवण करून ते घरी परतले होते. दरम्यानच्या कालावधीत त्यांचा खून झाला. त्यांचे आई-वडील सायंकाळी साडेसहा वाजता जैनवाडी येथून घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस