संक्षिप्त वृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:04 IST2021-01-13T05:04:23+5:302021-01-13T05:04:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंंदोलनाला पाठिंबा म्हणून शुक्रवारी फेरीवाल्यांचे ...

संक्षिप्त वृत्त
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंंदोलनाला पाठिंबा म्हणून शुक्रवारी फेरीवाल्यांचे शुक्रवारी शिवाजी चौकात आंदोलन होणार आहे. कोल्हापूर जिल्हा फेरीवाले कृती समितीने आंदोलनाची हाक दिली आहे. दरम्यान, राष्ट्रीय फेरीवाले धोरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी कृती समितीचे सदस्य आर.के. पोवार यांच्या कार्यालयात सकाळी १० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आंदोलन व बैठकीला फेरीवाल्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रवळनाथ सल्लागार समितीवर विजय हरगुडे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : रवळनाथ को-ऑप. हाऊसिंग सोसायटीच्या कोल्हापूर शाखा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी विजय मधुकर हरगुडे यांची नियुक्ती झाल्याचे संस्थापक अध्यक्ष एम.एल. चौगुले यांनी सांगितले. सोमवारी संचालक मंडळाच्या बैठकीत शाखा सल्लागार मंडळाची नियुक्ती करण्यात आली. या मंडळात रामचंद्र पाटील, प्राचार्य डॉ. एच.व्ही. देशपांडे, प्रा. डॉ. सतीश घाळी, अमृत सुतार, डाॅ. वासंती रासम, भास्कर सांगावकर, डॉ. अण्णासाहेब कलगोंडा, डॉ. वर्षा मैंदर्गी, रवींद्र पाेर्लेर यांचाही समावेश करण्यात आला.
(१२०१२०२१-कोल-विजय हरगुडे)