संक्षिप्त वृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:22 IST2021-03-24T04:22:42+5:302021-03-24T04:22:42+5:30
कोल्हापूर : दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुरानंतर खोची (ता. हातकणंगले) येथील नुकसानीचे प्रशासनाने चुकीचे पंचनामे करून अनुदान वाटप केले आहे. ...

संक्षिप्त वृत्त
कोल्हापूर : दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुरानंतर खोची (ता. हातकणंगले) येथील नुकसानीचे प्रशासनाने चुकीचे पंचनामे करून अनुदान वाटप केले आहे. तरी या प्रकाराची चौकशी करून बाधितांना न्याय मिळावा यासाठी पूरग्रस्तांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
पुरामुळे घर बुडाले, साहित्यांचे नुकसान झाले, त्यावेळी एक महिना आम्ही गावातील शाळेत राहत होतो; पण अधिकाऱ्यांनी जागेवर न जाता एकाच ठिकाणी बसून पंचनामे केले. ज्याच्या उंबऱ्यालाही पाणी लागले नाही त्या व्यक्तीला अनुदानाचा लाभ देण्यात आला. पा प्रकार माहिती अधिकारात उघडकीस आला व आम्ही पात्र असूनही अपात्र दाखवण्यात आल्याने आम्ही लाभापासून वंचित राहिलो तरी या प्रकाराची चौकशी व्हावी, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी व बाधितांना न्याय मिळावा, अशी मागणी पूरग्रस्तांनी केली आहे.
---
राममनोहर लोहिया जयंती साजरी
कोल्हापूर : कावळा नाका येथील डॉ. राममनोहर लोहिया नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने लोहिया यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पतसंस्थेचे मॅनेजर देवेंद्र भोसले, सुमन यादव, दशरथ पाटील, आशिष चिंचवाडकर व सभासद उपस्थित होते.
----