शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव वर्गणीवरून दुकानमालकावर खुनी हल्ला

By admin | Updated: August 31, 2015 00:36 IST

कोल्हापुरातील घटना : ‘पीटीएम’च्या कार्यकर्त्यांचे कृत्य; दुकानाची तोडफोड

कोल्हापूर : गणेशोत्सवाची वर्गणी कमी दिल्याच्या रागातून मंगळवार पेठेतील ‘पीटीएम’च्या कार्यकर्त्यांनी शिवाजी स्टेडियम येथील हिंद स्टेशनरीच्या मालकावर रविवारी सायंकाळी खुनी हल्ला केला. अझरूद्दीन अल्ताफ मोमीन (३०, रा. मंडलिक वसाहत) असे जखमीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, शिवाजी स्टेडियम येथील गाळ्यामध्ये अझरूद्दीन मोमीन यांचे हिंद स्टेशनरी स्टोअर्स दुकान आहे. नेहमीप्रमाणे रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास ते दुकानात होते. यावेळी मंगळवार पेठेतील ‘पीटीएम’चे कार्यकर्ते गणेशोत्सवाची वर्गणी मागण्यासाठी आले. यावेळी मोमीन यांनी ५१ रुपयांची पावती केली. त्यास कार्यकर्त्यांनी विरोध करत १०१ रुपयांची पावती करण्यास सांगितले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला.यावेळी पाण्याचा कॅन व लोखंडी रॉड त्यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले तसेच त्यांच्या दुकानाची तोडफोडही करण्यात आली. या प्रकाराने गोंधळ उडाल्याने परिसरात तणाव पसरला. हल्ल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मोमीन यांच्या अन्य नातेवाईकांनी त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. पोलिसांनी सीपीआरमध्ये येऊन जखमी मोमीन यांच्या प्रकृतीची विचारपूस करून हल्लेखोरांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी ‘पीटीएम’च्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे सांगितले. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करून संशयितांची धरपकड सुरू होती. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डी. एम. गायकवाड करत आहेत. (प्रतिनिधी)