शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

उधार का देत नाही म्हणून दुकानदारांसह तिघांना रॉडने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 7:27 PM

दुकानातून उधारीवर साहित्य का देत नाही, असा जाब विचारत दुकानदारासह त्याच्या नातेवाईकांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना कदमवाडी येथे घडली. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले. संजय आनंदराव शहापुरे, अमय सुरेश जाधव (रा. कोपार्डे कॉर्नर, कदमवाडी) हे जखमी झाले. दुकानदार मयूर माणिक शहापुरे यांच्या तक्रारीवरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात प्रसाद आबाजी आडुळकर (रा. माळ गल्ली, सुवर्णदीप अपार्टमेंट, कदमवाडी), सौरभ कागीनकर (रा. चव्हाण गल्ली, भोसलेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देउधार का देत नाही म्हणून दुकानदारांसह तिघांना रॉडने मारहाणकदमवाडीतील घटना : दोघे गंभीर जखमी; दोघांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर : दुकानातून उधारीवर साहित्य का देत नाही, असा जाब विचारत दुकानदारासह त्याच्या नातेवाईकांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना कदमवाडी येथे घडली. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले. संजय आनंदराव शहापुरे, अमय सुरेश जाधव (रा. कोपार्डे कॉर्नर, कदमवाडी) हे जखमी झाले. दुकानदार मयूर माणिक शहापुरे यांच्या तक्रारीवरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात प्रसाद आबाजी आडुळकर (रा. माळ गल्ली, सुवर्णदीप अपार्टमेंट, कदमवाडी), सौरभ कागीनकर (रा. चव्हाण गल्ली, भोसलेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.कदमवाडीत कोपार्डे कॉर्नर येथे मयूर शहापुरे यांचे रविकिरण किराणा स्टोअर्स हे दुकान आहे. रविवारी रात्री ते आपले दुकान बंद करत होते. त्याचवेळी तेथे प्रसाद आडुळकर, सौरभ कागीनकर हे दोघे आले. त्यांनी मयूर व त्याचे वडील माणिक शहापुरे यांना तुम्ही किराणा साहित्य उधार का देत नाही, आमची भीती राहिली नाही का? असा जाब विचारत मारहाण व शिवीगाळ केली. त्यावेळी गोंधळ, आरडाओरडा झाल्याने मयूरचे चुलते संजय शहापुरे व पुतणे अमय जाधव हे दोघे धावतच तेथे आले.

त्यावेळी संशयितांनी हातातील लोखंडी रॉडने त्या दोघांनाही बेदम मारहाण केली. या हल्ल्यात संजय शहापुरे व अमय जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत दुकानदार मयूर शहापुरे यांनी तक्रार दिल्यानुसार गुन्हा दाखल कारण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सहायक फौजदार प्रकाश भंडारे करत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर