धक्कादायक! कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे आणखी २ पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 21:20 IST2020-05-14T21:19:52+5:302020-05-14T21:20:10+5:30

शाहूवाडी तालुक्यातील गरोदर महिला सीपीआर रुग्णालयात दिनांक ११ मे रोजी सायंकाळी दाखल झाल्या होत्या.

Shocking! 2 more positive corona in Kolhapur district | धक्कादायक! कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे आणखी २ पॉझिटिव्ह

धक्कादायक! कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे आणखी २ पॉझिटिव्ह

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शित्तुर तर्फ मलकापूर शाहूवाडी येथील ३३ वर्षीय गरोदर महिलेचा कोरोना चाचणी अहवाल आत्ता काही वेळापूर्वी पॉझिटिव्ह आला असून इचलकंजीतील येथील आणखी एका युवकालाही कोरोनाची बाधा झाली आहे.

शाहूवाडी तालुक्यातील गरोदर महिला सीपीआर रुग्णालयात दिनांक ११ मे रोजी सायंकाळी दाखल झाल्या होत्या. त्यांनी त्यांच्या पती आणि एक ड्रायव्हर सोबत मुंबई येथून प्रवास केला आहे. त्यांना शिवाजी विद्यापीठात संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. त्यांचे अहवाल अद्याप प्राप्त झाले नाहीत. महिला रुग्णाला कोरोना कक्षात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Shocking! 2 more positive corona in Kolhapur district