शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार, इचलकरंजीत माजी सभापती चोपडे चार माजी नगरसेवकांसह अजित पवार गटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 12:26 IST

चोपडे यांची इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष म्हणून तर अमित गाताडे यांची शहर कार्याध्यक्षपदी निवड

इचलकरंजी : शहरातील राष्ट्रवादीला खिंडार पडले असून, नगरपालिकेचे माजी सभापती विठ्ठल चोपडे यांनी महिला आघाडी शहर अध्यक्षांसह चार माजी नगरसेवकांना सोबत घेऊन मंगळवारी अजित पवार गटात सहभागी झाले. मुंबईत झालेल्या प्रवेशानंतर चोपडे यांची इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष म्हणून तर अमित गाताडे यांची शहर कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील राष्ट्रवादीत जांभळे-कारंडे असे दोन गट आहेत. स्थानिक निवडणुकीत अनेक वेळा हे दोन गट वेगवेगळी भूमिका घेत होते. गतवर्षी हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यात समेट घडवून इचलकरंजी राष्ट्रवादी एकसंध केली. त्यानंतर शरद पवारांपासून फुटून अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. त्यावेळी इचलकरंजी राष्ट्रवादी एकसंध असल्याचे सांगत विठ्ठल चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते.दरम्यान, शहराचा पाणीप्रश्न व अन्य राजकीय घडामोडींनंतर चोपडे यांनी निर्णय बदलत अजित पवार गटात सहभागी होण्याचे ठरवले. त्यानुसार मंगळवारी मुंबई येथील महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेविका तथा राष्ट्रवादीच्या महिला आघाडी शहर अध्यक्षा माधुरी चव्हाण, माजी नगराध्यक्ष राजाराम धारवट, माजी नगरसेवक श्रीकांत कांबळे, दत्ता देडे, आबा निडंगरे यांच्यासह गाताडे, बाळासाहेब देशमुख, गणेश माच्छरे, निहाल कलावंत, सुभाष मालपाणी, सलीम ढालाईत, उत्कर्ष सूर्यवंशी, दिलावर पटेल, लखन बेनाडे, अथर्व जाधव, अमोल मद्यापगोळ, राजू रावळ, प्रकाश जगताप, प्रमोद दाडमोडे, राजू आरगे, सुनील बोणे, राहुल कांबळे, रज्जाक शेख, प्रसाद तांबे, नंदकुमार टेके आदी उपस्थित होते.

शहरातील राष्ट्रवादी कॉँग्रेस बळकट करण्यासाठी कार्यरत राहा. संघर्ष करावा लागला तरी डगमगू नका. शहराला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी उपमुख्यमंत्री म्हणून ताकदीने तुमच्या पाठीशी उभा राहीन, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हाला दिला आहे. त्यानुसार आमची पुढील रुपरेषा लवकरच आखली जाणार आहे. आमच्यासोबत आणखीन काही प्रमुख पदाधिकारीही लवकरच प्रवेश करणार आहेत. - विठ्ठल चोपडे 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार