शोभा बोंद्रे यांची कोल्हापूरच्या महापौरपदी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 13:02 IST2018-05-25T13:02:48+5:302018-05-25T13:02:48+5:30

महापौरपदी काँग्रेसच्या शोभा पंडितराव बोंद्र यांची बहुमताने निवड झाली आहे.

Shobha Bondre elected as mayor of Kolhapur | शोभा बोंद्रे यांची कोल्हापूरच्या महापौरपदी निवड

शोभा बोंद्रे यांची कोल्हापूरच्या महापौरपदी निवड

कोल्हापूर- कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या शोभा पंडितराव बोंद्र यांची बहुमताने निवड झाली आहे. आज पार पडलेल्या निवडणुकीत शोभा बोंद्रे यांनी ताराराणी आघाडीच्या रूपराणी निकम यांचा पराभव केला. बोंद्रे यांना ४४ मतं मिळाली, तर निकम यांना ३३ मतं मिळाली. महापौरपदाच्या या निवडणुकीत शिवसेनेच्या प्रतिज्ञा निल्ले यांनी माघार घेतल्याने कॉग्रेसचा विजय अधिक सुकर झाला होता. 

तर कोल्हापूरच्या उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महेश सावंत यांची बहुमताने निवड झाली. सावंत यांनी प्रतिस्पर्धी ताराराणी आघाडीच्या कमलाकर भोपळे यांचा पराभव केला. सावंत यांना ४४ मतं, तर भोपळे यांना ३३ मतं पडली. शिवसेनेच्या अभिजीत चव्हाण गैरहजर राहिल्याने उमेदवारी अर्ज मागे घेता आला नाही.

Web Title: Shobha Bondre elected as mayor of Kolhapur