शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

शिवभक्ताला सलाम; २४ वर्षे विनामोबदला करतोय शिवरायांच्या पुतळ्याची देखभाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 15:20 IST

गेली २४ वर्षे न चुकता दररोज सकाळी नगरपरिषदेसमोर असणाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विनामोबदला निगा राखत पूजन करून आपल्या दिवसाची सुरुवात करणारा सच्चा शिवभक्त मुरगूडमध्ये कार्यरत आहे.

अनिल पाटील 

मुरगूड : गेली २४ वर्षे न चुकता दररोज सकाळी नगरपरिषदेसमोर असणाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विनामोबदला निगा राखत पूजन करून आपल्या दिवसाची सुरुवात करणारा सच्चा शिवभक्त मुरगूड (ता. कागल)मध्ये कार्यरत आहे. व्यवसायाने परीट असलेल्या, शिवभक्तीने झपाटलेल्या या तरुणाचे नाव आहे धोंडिराम पांडुरंग परीट-शिंदे.

पुतळ्याच्या सेवेमध्ये खंड पडू नये म्हणून धोंडिराम परीट परगावी जाण्याचेही टाळतात. सकाळी स्नान आटोपून सायकलला एका बाजूला झाडू तर एका बाजूला हार, हातामध्ये पाण्याची बादली, खांद्यावर परीट घडीचा टॉवेलसह घरातून थेट नगरपालिकेच्या प्रांगणातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळच ते येतात. तेथून अर्धा तास संपूर्ण परिसर झाडून काढणे, पाणी मारणे, त्यानंतर पुतळ्याची स्वच्छता, जलाभिषेक केल्यानंतर ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या नावाचा जयजयकार करून मग ही स्वारी आपल्या दुकानाकडे जाते.

विशेष म्हणजे आपल्या तुटपुंज्या मिळकतीत दैनंदिन थोडा निधी बाजूला काढून त्या निधीतून प्रत्येकवर्षी ते शिवजयंतीदिनी आपल्या दुकानाच्या दारासमोर शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा करतात. परीट यांचा हा उपक्रम सध्या लोकोत्सव म्हणून साजरा होत आहे. सध्या शहरातील अनेक नागरिक यासाठी सढळ हाताने मदत करत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून ते शिवजयंती दिवशी वेगवेगळे उपक्रम साजरे करतात. समाजामध्ये चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींना शिवप्रतिमा देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार तसेच दरवर्षी एका विषयावर नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी व्याख्यान आयोजित केले जाते. यावेळी बोलताना ते म्हणाले, शिवपुतळ्याच्या अखंडित सेवेमुळे आपल्याला वेगळीच ऊर्जा प्राप्त होते.मुरगूड नगरपालिकेच्या आवारात एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना रात्रीच्या वेळी मित्रासह शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच शेकोटी करत होतो. यावेळी पुतळ्यावर बरीच धूळ साचलेली दिसली. त्यावेळी वर्षातून एकदाच शिवजयंतीला शिवरायांचा जयजयकार होतो; पण वर्षभर मात्र या पुतळ्याकडे दुर्लक्ष होते. शिवाजीराजे केवळ जयंतीसाठीच आहेत का? असा प्रश्न पडला. त्याचक्षणी ठरवले की आजपासून दररोज पुतळ्याची स्वच्छता करायची. त्या दिवसापासून गेली २४ वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सेवा करत आलोय.- धोंडिराम परीट-शिंदे

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivjayantiशिवजयंती