कोल्हापूरच्या शिवाली शिंदे हिची भारतीय ‘अ’ संघात निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 13:51 IST2019-12-27T13:48:36+5:302019-12-27T13:51:31+5:30

कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनची महिला क्रिकेटपटू शिवाली शिंदे हिची ४ ते ११ जानेवारी २०२० मध्ये कटक येथे होणाऱ्या भारतीय महिला टी-२० चॅलेंजर करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय ‘अ’ संघात निवड झाली.

Shivali Shinde of Kolhapur was selected in the Indian 'A' team | कोल्हापूरच्या शिवाली शिंदे हिची भारतीय ‘अ’ संघात निवड

कोल्हापूरच्या शिवाली शिंदे हिची भारतीय ‘अ’ संघात निवड

ठळक मुद्देकोल्हापूरच्या शिवाली शिंदे हिची भारतीय ‘अ’ संघात निवडसात वर्षे महाराष्ट्राच्या खुल्या गटातून राज्याचे प्रतिनिधीत्व

कोल्हापूर : जिल्हा क्रिकेट असोसिएशनची महिला क्रिकेटपटू शिवाली शिंदे हिची ४ ते ११ जानेवारी २०२० मध्ये कटक येथे होणाऱ्या भारतीय महिला टी-२० चॅलेंजर करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय ‘अ’ संघात निवड झाली.

या स्पर्धेत भारतीय ‘अ’ संघासोबत भारतीय ‘ब’, ‘क’, इंडिया ग्रीन, इंडिया ब्ल्यू (ब), इंडिया रेड या सहा संघांत टी-२० साखळी क्रिकेट सामने होणार आहेत. भारतीय ‘अ’ संघाचा पहिला सामना ४ जानेवारीला कटक येथे होणार आहे. यात २३ वर्षांखालील गटात कोल्हापूरच्या शिवालीची निवड झाली.

यापूर्वी २०१५-१६ या वर्षात बंगलोर येथील १९ वर्षांखालील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तिची निवड झाली. त्यानंतर तिने यानंतर सलग चार वर्षे महाराष्ट्राच्या महिला संघाचे प्रतिनिधित्व केले. २०१२ साली ती महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील संघाची कर्णधार म्हणून कामगिरी केली आहे.

२०१३-१४ या वर्षात आॅल इंडिया इंटरनॅशनल झोनल महिला स्पर्धेसाठीही तिची पश्चिम विभागीय (भारतीय) महिला क्रिकेट संघात उपकर्णधार म्हणून निवड झाली होती. सध्या ती सलग सात वर्षे महाराष्ट्राच्या खुल्या गटातून राज्याचे प्रतिनिधीत्व करीत आहे.
 

 

Web Title: Shivali Shinde of Kolhapur was selected in the Indian 'A' team