शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

भोगावती कारखान्याच्या अध्यक्षपदी शिवाजीराव पाटील, उपाध्यक्षपदी राजाराम कवडे

By विश्वास पाटील | Updated: December 1, 2023 13:24 IST

कोल्हापूर : परिते (ता.करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे प्रा. शिवाजीराव आनंदराव पाटील तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे राजाराम ...

कोल्हापूर : परिते (ता.करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे प्रा. शिवाजीराव आनंदराव पाटील तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे राजाराम कवडे यांची बिनविरोध निवड झाली. शुक्रवारी या निवडीसाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची सभा झाली. अध्यक्षस्थानी निवडणूक अधिकारी निलकंठ करे होते.कारखान्यात काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार पी.एन.पाटील, राष्ट्रवादीचे ए.वाय.पाटील, शेकापचे संपतराव पवार, आणि गोकूळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी २५ पैकी २४ जागा जिंकून सत्तेत आली आहे. अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून बी.ए.पाटील, प्रा.शिवाजीराव पाटील यांची नावे स्पर्धेत होती. परंतू प्रा.पाटील यांच्या धडाडीचा विचार करून त्यांना संधी देण्यात आली. त्यांच्या नावांची घोषणा आमदार पाटील यांनी केली. कारखान्यात आता चार गटांची सत्ता आली आहे. कारखाना आर्थिक अडचणीत आहे. शेतकरी संघटना, कामगारांची वारंवार आंदोलने असतात. सर्वांना सोबत घेवून जाणारा आणि खमक्या अध्यक्ष हवा असा विचार करून प्रा. पाटील यांच्याकडे कारखान्याची सुत्रे सोपवण्यात आली आहेत. प्रा.पाटील दोन पिढ्यापासून काँग्रेस आणि आमदार पाटील यांच्याशी एकनिष्ठ आहेत. ते मुळचे देवाळे (ता.करवीर) येथील आहेत.राष्ट्रवादीला सत्तेत वाटा द्यायचा ठरल्याने कवडे यांना उपाध्यक्षपदाचा मान मिळाला. ते ए.वाय.पाटील यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. करवीर व राधानगरी तालुक्यातील पदे देवून सत्तेचा समतोलही सांभाळण्यात आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस