शिवाजी विद्यापीठ करणार ‘सॅटेलाईट बेस्ड नेव्हिगेशन सिस्टीम’बाबत संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:24 IST2021-01-20T04:24:44+5:302021-01-20T04:24:44+5:30

ऑनलाईन स्वरूपात सामंजस्य कराराचा कार्यक्रम झाला. सुरुवात ‘जीएनएसएस’विषयक संशोधन सहकार्याने होत असली तरी केवळ तेवढ्यापुरताच हा करार मर्यादित राहू ...

Shivaji University to conduct research on 'Satellite Based Navigation System' | शिवाजी विद्यापीठ करणार ‘सॅटेलाईट बेस्ड नेव्हिगेशन सिस्टीम’बाबत संशोधन

शिवाजी विद्यापीठ करणार ‘सॅटेलाईट बेस्ड नेव्हिगेशन सिस्टीम’बाबत संशोधन

ऑनलाईन स्वरूपात सामंजस्य कराराचा कार्यक्रम झाला. सुरुवात ‘जीएनएसएस’विषयक संशोधन सहकार्याने होत असली तरी केवळ तेवढ्यापुरताच हा करार मर्यादित राहू नये, तर दोन्ही विद्यापीठांतील विविध अधिविभागांनी पुढे येऊन हे शैक्षणिक, संशोधनविषयक सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, असे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सांगितले. अवकाश संशोधनाच्या अनुषंगाने डाटा विश्लेषणात शिवाजी विद्यापीठाची कामगिरी उच्च दर्जाची आहे. या करारामुळे दोन्ही विद्यापीठांचा अवकाश संशोधनातील लौकिक निश्चितपणे वाढीस लागेल. संशोधन प्रकल्प संयुक्तपणे राबविले जातील, असे बरद्वान विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. ए. के. पाणिग्रही यांनी सांगितले.

या करारावर शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, बरद्वान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अभिजित मझुमदार यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत, बरद्वान विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.के. चक्रवर्ती यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. राजीव व्हटकर, अनिंद्य बोस यांनी सामंजस्य कराराचे समन्वयक म्हणून काम पाहिले.

चौकट

शैक्षणिक सहकार्य

बरद्वान विद्यापीठामध्ये ‘जी.एन.एस.एस.’संदर्भात प्रशिक्षण व संशोधनासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा आहे. शिवाजी विद्यापीठाचे अवकाश संशोधन केंद्र (एस.आर.सी.) हेसुद्धा अवकाश संशोधनासाठी विशेषतः डाटा विश्लेषणाच्या बाबतीत आघाडीवर आहे. इस्रोच्या आय.आर.एन.एस.एस. या उपग्रहाचा रिसिव्हर विद्यापीठाच्या पन्हाळा येथील उपकेंद्राच्या ठिकाणी कार्यान्वित आहे. सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या, भविष्यातील जी.एन.एस.एस. तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील पदार्थविज्ञान विभागाचे अवकाश संशोधन केंद्र आणि बरद्वान विद्यापीठाचे जीएनएसएस संशोधन केंद्र यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. याअंतर्गत दोन्ही विद्यापीठे एकमेकांना जी.एन.एस.एस.च्या अनुषंगाने शैक्षणिक व संशोधनपर सहकार्य करणार आहेत.

Web Title: Shivaji University to conduct research on 'Satellite Based Navigation System'