शिवाजी विद्यापीठ परिसरात घरफोडी, लाख रुपयांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 06:29 PM2018-08-14T18:29:13+5:302018-08-14T18:30:16+5:30

शिवाजी विद्यापीठ परिसरातील अंबाई डिफेन्स कॉलनी येथील बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे लाख रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केल्याचे सोमवारी (दि. १३) उघडकीस आले.

Shivaji University campus, a lodge worth Rs | शिवाजी विद्यापीठ परिसरात घरफोडी, लाख रुपयांचा ऐवज लंपास

शिवाजी विद्यापीठ परिसरात घरफोडी, लाख रुपयांचा ऐवज लंपास

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठ परिसरात घरफोडीरोख रकमेसह सुमारे लाख रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ परिसरातील अंबाई डिफेन्स कॉलनी येथील बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे लाख रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केल्याचे सोमवारी (दि. १३) उघडकीस आले.

अधिक माहिती अशी, सिकंदर अल्लाबक्ष बागवान (वय ६८) हे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. यावेळी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी तिजोरीतील दहा हजार रुपये, चांदीच्या तीन वाट्या, तीन तोळ्यांचे सोन्याचे जोंधळपोत, झुबे, रिंगा, घड्याळ असा सुमारे एक लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याचे सोमवारी दिसून आले. या प्रकरणी बागवान यांनी राजारामपुरी पोलिसांत फिर्याद दिली.
--------------------
- एकनाथ

 

Web Title: Shivaji University campus, a lodge worth Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.