पावनखिंड परिसरात मद्यपान करणाऱ्या युवकांना शिवभक्तांनी दिला चोप, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 19:13 IST2022-07-14T14:06:10+5:302022-07-14T19:13:41+5:30
मात्र अद्याप या घटनेची नोंद शाहूवाडी पोलीस ठाण्यात झालेली नाही.

पावनखिंड परिसरात मद्यपान करणाऱ्या युवकांना शिवभक्तांनी दिला चोप, व्हिडीओ व्हायरल
राजू कांबळे
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील ऐतिहासिक असलेल्या पावनखिंड परिसरात मद्यपान करणाऱ्या दोघा युवकांना शिवभक्तांनी चांगलाच चोप दिला. याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मात्र अद्याप या घटनेची नोंद शाहूवाडी पोलीस ठाण्यात झालेली नाही. यापुर्वीही अशाच काही मद्यपान करणाऱ्या युवकांना शिवभक्तांनी चोप दिला होता.
नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना अभिवादन करण्यासाठी पावनखिंड येथे शिवभक्तांनी गर्दी केली होती. काल, बुधवारी सायंकाळी दोन युवक गुटखा खाऊन थुंकल्याचे काही शिवभक्तांच्या निदर्शनास आले. यावेळी संबंधित युवकांना या ठिकाणी थुंकू नका असे शिवभक्तांनी सांगितले.
मात्र संबंधित युवकांनी त्यास विरोध केला. यानंतर या युवकांनी मद्यपान केल्याचेही लक्षात येताच संतप्त शिवभक्तांनी व परिसरातील नागरीकांनी त्यांची धुलाईच केली. याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यापुढे पावनखिंड परिसरात मद्यपान करणाऱ्या युवकावर कडक कारवाई करण्याचा इशारा पावनखिंड रक्षक समितीचे पदाधिकारी व शिवभक्तांनी दिला आहे.
पावनखिंड परिसरात मद्यपान करणाऱ्या युवकांना शिवभक्तांनी दिला चोप, व्हिडीओ व्हायरल.#kolhapurpic.twitter.com/Pdp14EwZCv
— Lokmat (@lokmat) July 14, 2022