शिवसेना महिला आघाडीकडून कंगणाच्याविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 19:16 IST2020-09-05T19:16:05+5:302020-09-05T19:16:33+5:30

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत विरोधात राज्यभर संताप व्यक्त होत आहेत. शनिवारी कोल्हापुरातही शिवसेनेच्या शहर महिला विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रणरागिणीनीही रस्त्यावर उतरल्या.

Shiv Sena Women's Front agitates against Kangana | शिवसेना महिला आघाडीकडून कंगणाच्याविरोधात आंदोलन

 शिवसेना शहर महिला आघाडीतर्फे शनिवारी कोल्हापुरात शिवाजी पुतळा येथे कंगना रानावत हिच्या प्रतिमेला जोडे मारुन मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला.

ठळक मुद्देशिवसेना महिला आघाडीकडून कंगणाच्याविरोधात आंदोलन

कोल्हापूर : मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत विरोधात राज्यभर संताप व्यक्त होत आहेत. शनिवारी कोल्हापुरातही शिवसेनेच्या शहर महिला विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रणरागिणीनीही रस्त्यावर उतरल्या.

शिवाजी चौकात कंगना राणावतच्या प्रतिमेला जोडे मारुन प्रतिमेचे दहनही केले. आघाडीच्या अध्यक्षा पूजा कमते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

महिला आघाडीच्या पूजा भोर, गौरी माळतकर, मंगल कुलकर्णी, शाहीन काझी, सुनिता भोपळे, श्रद्धा यादव, ज्योती भोसले, सिंधू घोलप, सुलभा हंकारे, पूजा शिंदे, फातिमा बागवान, रवि चौगुले, अरुण सावंत, जयवंत हारुगले, रमेश खाडे, रणजीत जाधव, किशोर घाटगे, सुनील जाधव आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Web Title: Shiv Sena Women's Front agitates against Kangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.