शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन; मुख्यमंत्री येत्या १५ ते १७ फेब्रुवारीस कोल्हापुरात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 12:58 IST2024-02-07T12:58:30+5:302024-02-07T12:58:57+5:30

कोल्हापूर : शिवसेना शिंदे गटाचे राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापुरात १५ ते १७ दरम्यान होत असून त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित ...

Shiv Sena National Convention; Chief Minister in Kolhapur from February 15 to 17 | शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन; मुख्यमंत्री येत्या १५ ते १७ फेब्रुवारीस कोल्हापुरात 

शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन; मुख्यमंत्री येत्या १५ ते १७ फेब्रुवारीस कोल्हापुरात 

कोल्हापूर : शिवसेना शिंदे गटाचे राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापुरात १५ ते १७ दरम्यान होत असून त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचा दोन दिवस कोल्हापुरात मुक्काम असणार आहे.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत ही माहिती बैठकीत सांगितली. राज्य सरकारच्या निधीतून सुरू असलेल्या विकास कामांची गती वाढवावी, त्यातील काही कामांचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्याची तयारी करावी, अशा सूचनाही त्यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.

कोल्हापूर शहरासाठी राबविण्यात आलेल्या काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेचे लोकार्पणदेखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करता येईल, अशा पद्धतीने तयारी करावी, असे क्षीरसागर यांनी सांगितले.

Web Title: Shiv Sena National Convention; Chief Minister in Kolhapur from February 15 to 17