शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
4
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
5
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
6
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
7
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
8
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
9
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
10
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
11
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
12
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
13
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
14
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
15
अन्वयार्थ: अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

फुले, भाजी विक्रेता ते आमदार, रमेश लटकेंचा थक्क करणारा राजकीय प्रवास; कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडीचे सुपुत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 2:38 PM

हाडाचा शिवसैनिक म्हणून ‘मातोश्री’वर त्‍यांची ओळख होती. अगदी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

इस्माईल महातयेळवण जुगाई (कोल्हापूर) : शिवसेनेचे आमदार रमेश कोंडीबा लटके (वय-५२) यांचे काल, बुधवारी रात्री हृदयविकाराच्या धक्याने दुबई येथे निधन झाले. मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघामधून आमदार म्हणून ते निवडून आले होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह मतदारसंघातील नागरिकांना धक्का बसला.आमदार रमेश लटके हे शाहूवाडी तालुक्यातील येळवण जुगाई जवळच्या शेम्बवणे पैकी धुमकवाडी या छोट्या गावातील मूळ रहिवासी होते. येळवण जुगाई येथे त्यांचे घर आहे. कोरोना काळापासून त्याचे आई-वडील येळवण जुगाई येथेच राहात आहेत. त्यांचा एक भाऊ, बहीण, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.वडिलांसोबत मुंबईत दुधाचा व्यवसायवडिलांसोबत त्यांनी मुंबईत दुधाचा व्यवसाय, फुलांच्या माळा (हार) विकण्याचा व्यवसायाने आपली कारर्कीद सुरु केली. यातून त्यांनी लोकसंपर्काच्या जोरावर शिवसेना शाखा प्रमुख, मुंबई महानगरपालिकेचे प्रथम १९९७ साली नगरसेवक झाले. पुढे २००२ आणि २००९ रोजी नगरसेवक झाले असे सलग तीनदा नगरसेवक, स्थायी समिती सभापती, बेस्ट अध्यक्ष आणि पुढे २०१४ व २०१९ साली सलग दोन वेळा आमदार झाले. असा सर्वसामान्यांना थक्क करणारा राजकीय प्रवास केला.शाहूवाडी विधानसभेची लढवली होती पोटनिवडणूकशिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर रमेश लटके यांनी शाहूवाडी-पन्हाळा विद्यानसभा (सन २०००) पोटनिवडणूक लढवली होती. शाहूवाडी तालुक्यात शिवसेना संघटना बांधणीत त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले होते. पण आपण राहात असलेल्या गावात स्थानिक राजकारणात भाग घेतला नाही.सलग दोनवेळा आमदारकाँग्रेसचे सुरेश शेट्टी यांचा पराभव करुन २०१४ मध्ये रमेश लटके हे  पहिल्यांदा आमदार झाले. २०१९ मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार एम. पटेल यांना पराभूत केले होते. हाडाचा शिवसैनिक म्हणून ‘मातोश्री’वर त्‍यांची ओळख होती. अगदी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी परराष्ट्र खात्याकडून प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.शाहूवाडीतील गोतावळा मुंबईकडे रवानात्यांच्या निधनाची बातमी समजताच येळवण जुगाई येथे राहत असलेले त्यांचे आई-वडील व भावकी व पाहुणे मंडळी मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबई येथे त्यांच्यावर अंतविधी होणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाRamesh Latekeरमेश लटके