बेंन्टेक्सचे दागिने घातलेला संजय मंडलिकांचा कटआऊट, मोर्चात शिवसैनिकांची घोषणाबाजी; मात्र..

By समीर देशपांडे | Updated: August 11, 2022 13:59 IST2022-08-11T13:47:38+5:302022-08-11T13:59:04+5:30

खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधात शिवसैनिकांचा मोर्चा

Shiv Sainiks march on MP Sanjay Mandlik house in Kolhapur | बेंन्टेक्सचे दागिने घातलेला संजय मंडलिकांचा कटआऊट, मोर्चात शिवसैनिकांची घोषणाबाजी; मात्र..

बेंन्टेक्सचे दागिने घातलेला संजय मंडलिकांचा कटआऊट, मोर्चात शिवसैनिकांची घोषणाबाजी; मात्र..

कोल्हापूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या खासदार संजय मंडलिकांच्या विरोधात शिवसैनिकांनी आज, गुरुवारी त्यांच्या कोल्हापूरमधील घरावर मोर्चा काढला. परंतू या मोर्चात मोजकेच शिवसैनिक उपस्थित राहिल्याने हा मोर्चा नेहमीसारखा रंगला नाही. जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, शहरप्रमुख रवि इंगवले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. रक्षाबंधनाच्या सणामुळे शिवसैनिकांनी मात्र मोर्चाकडे पाठ फिरवली.

मंडलिक यांचे रूईकर कॉलनीमध्ये असलेले निवासस्थान नव्याने बांधण्यात येत आहे. त्यामुळे मंडलिक हे बसस्थानकाजवळच्या शिवाजी पार्कमध्ये सध्या वास्तव्यास आहेत. याच घरावर हा मोर्चा काढण्यात आला होता. परंतू पोलिसांनी मुख्य रस्त्यावरच हा मोर्चा अडवला. या ठिकाणी उभारलेल्या व्यासपीठावरून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मंडलिकांचा येथेच्छ समाचार घेतला.

परंतू, रक्षाबंधनाच्या सणामुळे मात्र कार्यकर्त्यांनी मोर्चाकडे पाठ फिरवली होती. यामुळे शिवसैनिकांपेक्षा पोलिसांची संख्याच जास्तच दिसत होती. फडफडणाऱ्या भगव्या ध्वजामुळे आणि बेंन्टेक्स दागिने घातलेल्या मंडलिक यांच्या कटआऊटमुळे, तर संजय मंडलिक कोण रे... अशा घोषणांबाजीमुळे मात्र मोर्चामध्ये वातावरण निर्मिती झाली.

Web Title: Shiv Sainiks march on MP Sanjay Mandlik house in Kolhapur