शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
4
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
5
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
6
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
7
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
8
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
9
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
10
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
11
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
12
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
13
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
14
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
15
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
16
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
17
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
19
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
20
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

शिरोली नाक्यावरील टोलवसुली बंद पाडली

By admin | Updated: January 24, 2015 00:19 IST

कृती समितीचे ठिय्या आंदोलन : जोरदार घोषणाबाजी; टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना पिटाळले ; तासभर तणाव

कोल्हापूर : सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आज, शुक्रवारी शिरोली टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन केले. टोलविरोधात जोरदार घोषणबाजी करीत आंदोलकांनी नाक्यावरील कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलकांनी माघार घेतली. आंदोलनामुळे सुमारे तासभर नाका ‘टोल फ्री’ राहिला.टोलविरोधी कृती समितीच्या एका सदस्याबरोबर शिरोली टोलनाक्यावर काल, गुरुवारी टोल देण्यावरून वादावादी झाली होती. हा प्रकार समजताच टोल समितीच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्याकडे धाव घेतली होती. काही वेळ टोलवसुलीही बंद पाडली. संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर प्रकरण मिटले होते. मात्र, पोलिसांनी ‘त्या’ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली नाही. याचे पडसाद आज, शुक्रवारी आंदोलनाच्या रूपाने पुन्हा उमटले. दुपारी चारच्या सुमारास नाक्यापासून शंभर मीटर अंतरावर ठिय्या आंदोलन करीत कार्यकर्त्यांनी टोलविरोधात जोरदार घोषणबाजी करण्यास सुरुवात केली. विस्कळित झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी विनंती करीत आंदोलकांना रस्त्याच्या बाजूला घेत, एका बाजूने वाहनांना वाट करून दिली. रस्त्याच्या बाजूला टोलविरोधात कार्यकर्ते घोषणाबाजी करीत असतानाच शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ढवण, सुनील मोरे, आदी कार्यकर्त्यांनी नाक्याकडे धाव घेतली. कृती समितीचे कार्यकर्ते नाक्याकडे चाल करून येत असल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी धूम ठोकली. या कर्मचाऱ्यांमागून कार्यकर्तेही पळत सुटले. अखेर वाट दिसेल तिकडे जीव मुठीत घेऊन कर्मचारी पसार झाले. कर्मचारी पळून जाताच कार्यकर्त्यांनी ‘कुठाय तो कालचा माणूस... मॅनेजर कुठाय... आता का बिळात बसलाय...?’ असे म्हणत आव्हान देण्यास सुरुवात केली. कर्मचाऱ्यांची पळापळ सुरू झाल्याने केबिनमधील कॅशिअर्सनीही पावत्या व रोख रक्कम ताब्यात घेत केबिन्स रिकाम्या केल्या. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.यानंतर कार्यकर्त्यांनी नाक्याच्या पलीकडे पोलिसांसाठी उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये लपलेल्या व्यवस्थापकाला गाठले. ‘क ोल्हापुरात दादागिरी चालणार नाही... पुन्हा दमदाटी करण्याचा प्रकार घडला तर याद राखा, गाठ कोल्हापूरकरांशी आहे...’ असा दम दिला. अखेर पोलिसांनी व्यवस्थापकाची आंदोलकाच्या तावडीतून सुटका केली. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद चौधरी यांनी आंदोलकांशी चर्चा के ली. पोलीस कारवाई करतील, असे ठोस आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे, बाबा इंदुलकर, बाबासाहेब पाटील (भुयेकर), अशोक पोवार, बाबा पार्टे, रमेश मोरे, संभाजी जगदाळे, चंद्रकांत बराले, बजरंग शेलार, जयकुमार शिंदे, अशोक रामचंदानी, आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. नगरसेवक सत्यजित कदम यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. (प्रतिनिधी)