शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

साखर उत्पादनासंदर्भात शरद पवारांची आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 9:40 AM

साखर उत्पादनसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले होते.

कोल्हापूर  - राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे. साखर उत्पादनासंदर्भात दोघांमध्ये बैठक होणार आहे. कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. साखर उत्पादनसंदर्भात पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले होते. यंदा देशात साखरेचं गरजेपेक्षा अधिक उत्पादन झाले आहे. त्यामुळे साखर परदेशात निर्यात करणं गरजेचं असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. शिवाय, 60 टक्के साखरेवर सेस लावून, रक्कम उत्पादकांना द्यावी. तसंच साखरेच्या वाहतूक खर्चासाठी केंद्र सरकारनं मदत करावी, अशी मागणीदेखील पवार यांनी यावेळी केली आहे.

''नाणार प्रकल्पावरुन मुख्यमंत्र्यांनी धमकावू नये''

दरम्यान,  नाणार प्रकल्पावरून मुख्यमंत्र्यांनी धमकावू नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी दिला. पवार म्हणाले, या प्रकल्पावरून सुरू असलेले राजकारण योग्य नाही. राज्यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणारा हा प्रकल्प आहे. कोकणात नाही जमीन मिळाली, तर प्रकल्प गुजरातला जाईल असे मुख्यमंत्री म्हणत आहेत. गुजरातला किंवा अन्य राज्यात हा प्रकल्प गेला तरी तो देशातच आहे. गुजरात काय पाकिस्तानमध्ये नाही. कोकणातील जनतेचे किंवा त्या प्रदेशाचे हा प्रकल्प झाल्यावर अहित होणार असेल तर त्या लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. हा प्रकल्प नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी 10 मे रोजी मी प्रकल्पस्थळास भेट देणार आहे. पण तिथे सभा वगैरे घेणार नाही, असे पवार यांनी सांगितले.

शरद पवारांचा चंद्रकांत पाटील यांना सवाल

कोठड्या भरण्यासाठी कोणाची वाट पाहताय, असा सवालही यावेळी शरद पवार यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारला.मुंबईतील भाजपा मेळाव्यात भुजबळ यांच्या शेजारी 2-3 कोठड्या शिल्लक असल्याचे वक्तव्य मंत्री पाटील यांनी केले होते. यावर पवार म्हणाले की, " राज्यात सत्ता तुमचीच आहे, त्यामुळे कोठड्या भरण्यासाठी वाट कशाची बघताय..? आमची त्यास हरकत नाही. उलट तुरुंगात जाऊन आल्यावर पुढची निवडणूक सोपी जाते. चंद्रकांतदादा काय बोलतात त्यांच्या बद्धल न बोललेच बरे. मुख्यमंत्री नागपूरचे असले तरी कोल्हापूर सत्तेचे उपकेंद्र झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माहीत नसलेल्या गोष्टीही ते जाहीर करून टाकतात. आयुष्यात माणसाला एखादी गोष्ट कधीतरी मिळाली की सकाळ, दुपार, संध्याकाळ तो काही बोलत सूटतो असे त्यांचे झाले आहे. आता त्यांनी एकदा थेट निवडणूक लढवून दाखवावी म्हणजे त्यांना लोकांकडून अजून काही चांगले शिकायला मिळेल असा टोला ही पवार यांनी लगावला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीSugar factoryसाखर कारखाने