Sharad Pawar's craze has increased in Auburn | शरद पवारांची आबावृद्धांमध्ये वाढली ‘क्रेझ’ 
शरद पवारांची आबावृद्धांमध्ये वाढली ‘क्रेझ’ 

ठळक मुद्देशरद पवारांची आबावृद्धांमध्ये वाढली क्रेझ कोल्हापूर दौऱ्यावर भेटण्यासाठी उडाली झुंबड

कोल्हापूर : माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांचे राज्यातच नव्हे तर देशातही वलय निर्माण केले आहे. विधानसभेच्या निवडणूकीमध्ये कऱ्हाड येथील पावसात केलेल्या भाषणामुळे तर त्यांची आबालवृद्धांमध्ये ‘क्रेझ’  वाढली आहे. याची प्रचिती आज, शुक्रवारी कोल्हापुरात आली. ते दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांना भेटण्यासाठी अक्षरशा झुंबड उडाली.

अनेकांना गुरुवारी भेटता न आल्यामुळे शुक्रवारी सकाळी पहाटेपासूनच त्यांचा मुक्काम असलेल्या एका हॉटेलमध्ये रिघ लागली होती. यामध्ये आजी माजी पदाधिकारी खेळाडू यांच्यासह लहान मुलांचाही सहभाग लक्षणिय होता.

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या राज्य अधिवेशनासाठी शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. पंचशिल हॉटेलमध्ये भेटण्यासाठी त्यांना विविध संस्था, संघटनेसह नागरीकांनी गर्दी केली होती. साताऱ्याला रवाना होणार असल्याने शनिवारी सकाळी त्यांना भेटण्यासाठी गर्दी झाली होती.

Web Title: Sharad Pawar's craze has increased in Auburn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.