शरद पवार पंतप्रधान होतील : डॉ. डी. वाय. पाटील यांची भविष्यवाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 16:02 IST2018-07-14T15:56:26+5:302018-07-14T16:02:23+5:30

शरद पवार पंतप्रधान व्हावेत अशी आपणा सर्वांची अपेक्षा आहे. एक दिवस ते नक्की पंतप्रधान होतील. ही माझी वाणी आहे. जेंव्हा ही वाणी खरी ठरेल तेंव्हा तुम्ही सगळे साक्षीदार असाल, अशी भविष्यवाणी  बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी शनिवारी येथे एका समारंभात  केली.

Sharad Pawar will be PM: Dr. D. Y PATIL'S PROPHECY | शरद पवार पंतप्रधान होतील : डॉ. डी. वाय. पाटील यांची भविष्यवाणी

शरद पवार पंतप्रधान होतील : डॉ. डी. वाय. पाटील यांची भविष्यवाणी

ठळक मुद्देशरद पवार पंतप्रधान होतील :  डॉ. डी. वाय. पाटील यांची भविष्यवाणी डॉ. योगेश जाधव सर्व पक्षीय नागरी सत्कार सोहळा

कोल्हापूर : शरद पवार पंतप्रधान व्हावेत अशी आपणा सर्वांची अपेक्षा आहे. एक दिवस ते नक्की पंतप्रधान होतील. ही माझी वाणी आहे. जेंव्हा ही वाणी खरी ठरेल तेंव्हा तुम्ही सगळे साक्षीदार असाल, अशी भविष्यवाणी  बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी शनिवारी येथे एका समारंभात  केली.

उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. योगेश जाधव यांचा येथील केशवराव भोसले नाट्यगृहात सर्व पक्षीय नागरी सत्कार सोहळा सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते.

यावेळी शाहू छत्रपती,  महापौर शोभा बोंद्रे , माजी महापौर आर.के.पोवार यांच्यासह खासदार, आमदार, समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Sharad Pawar will be PM: Dr. D. Y PATIL'S PROPHECY

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.