शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
3
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
4
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
5
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
6
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
7
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
8
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
9
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
10
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
11
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळे विराटचे लाड?
12
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
13
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
14
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
15
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
16
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
17
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
18
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
19
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
20
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ

Kolhapur Politics: आगामी विधानसभेसाठी शरद पवार गटाने केला पाच जागांवर दावा, पवारांसोबत पुण्यात बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 13:04 IST

काँग्रेसकडून ‘कोल्हापूर उत्तर’ घ्याच

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत ‘कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’ दोन्ही मतदारसंघ काँग्रेस व उद्धवसेनेला सोडले होते. तेथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात पाच जागा मिळाल्या पाहिजेत; त्यातही काँग्रेसकडून ‘कोल्हापूर उत्तर’ घ्याच, असा आग्रह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे धरला.प्रदेशाध्यक्ष पाटील हे रविवारी काही काळ कोल्हापुरात आले होते, त्यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विमानतळ येथे त्यांची भेट घेतली. विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. काँग्रेस व उद्धवसेनेच्या वतीने वेगवेगळ्या जागांवर दावा केला जात आहे. पक्षाकडून अद्याप काय करायचे? हे काही सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. कोणत्याही परिस्थितीत ‘चंदगड’, ‘कागल’, ‘राधानगरी’, ‘कोल्हापूर उत्तर’ व ‘इचलकरंजी’ या जागा पक्षाकडे घ्या, असा आग्रह जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी धरला.लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आघाडीच्या दोन्ही उमेदवारांसाठी नेटाने काम केले. या बळावर, काँग्रेस आता जागावाटपात दबाव वाढवत असेल तर ते ऐकून घेऊ नका, असे काही पदाधिकाऱ्यांनी उघड भूमिका मांडली. यानंतर, पाचही मतदारसंघांत चाचपणी करून तातडीने अहवाल सादर करण्याची सूचना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. यावेळी शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी आमदार राजीव आवळे, मदन कारंडे, सदानंद माळी, शिवाजी खोत, अमर चव्हाण, अनिल घाटगे, रावसाहेब भिलवडे, आदी उपस्थित होते.चार दिवसांत पवार यांच्यासोबत पुण्यात बैठकउद्धवसेना व काँग्रेसच्या पातळीवर विधानसभेची जोरदार तयारी सुरू आहे. त्यांच्याकडून जागांबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या चार दिवसांत पुण्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठक घेतली जाणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024