कोल्हापुरात गुरुवारपासून नेत्यांची मांदियाळी; शरद पवार, एकनाथ शिंदे यांचा दौरा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 18:19 IST2025-01-21T18:19:08+5:302025-01-21T18:19:32+5:30

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीनंतर राजकीयदृष्ट्या काहीसा शांत झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यात या आठवड्यात पुन्हा राजकीय धुरळा उडणार आहे. येत्या गुरुवारपासून ...

Sharad Pawar, Deputy Chief Minister Eknath Shinde, MP Supriya Sule in Kolhapur district from Thursday | कोल्हापुरात गुरुवारपासून नेत्यांची मांदियाळी; शरद पवार, एकनाथ शिंदे यांचा दौरा 

कोल्हापुरात गुरुवारपासून नेत्यांची मांदियाळी; शरद पवार, एकनाथ शिंदे यांचा दौरा 

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीनंतर राजकीयदृष्ट्या काहीसा शांत झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यात या आठवड्यात पुन्हा राजकीय धुरळा उडणार आहे. येत्या गुरुवारपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुप्रिया सुळे ही नेतेमंडळी जिल्ह्यात येत आहेत. 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना व्हाइट आर्मीच्या वतीने येत्या गुरुवारी (दि. २३) आपत्ती व्यवस्थापन महायोद्धा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊ सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी शरद पवार गुरुवारी कोल्हापुरात येणार आहेत. त्यादिवशी त्यांचा कोल्हापुरात मुक्काम असून, शुक्रवारी ते सांगलीला रवाना हाेणार आहेत. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही येत्या शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर आहेत. सरवडे (ता. राधानगरी) येथे राज्यातील आभार दौऱ्याचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. रुकडी (ता. हातकणंगले) येथील पंचकल्याण महोत्सवास शिंदे उपस्थितीत राहणार आहेत. 

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार लिखित मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई या ग्रंथाचे प्रकाशन शुक्रवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार आहे. न्यू पॅलेसच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार शाहू छत्रपती, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते, आमदार सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी उपस्थित राहाणार आहेत.

Web Title: Sharad Pawar, Deputy Chief Minister Eknath Shinde, MP Supriya Sule in Kolhapur district from Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.