शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

भाजपच्या बैठकीमध्ये शौमिका-अमलची हजेरी-: ‘मातोश्री’वर माझी तक्रार जाता कामा नये - पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:54 AM

एक मताने १९९८ मध्ये वाजपेयी सरकार पडले, सात जागा कमी पडल्याने २००४ मध्ये भाजप सरकार स्थापन करता आले नाही; त्यामुळे एक आणि एक जागा महत्त्वाची असून, शिवसेना-भाजपच्या उमेदवाराचा

ठळक मुद्देलोकसभेसाठी व्यूहरचना

कोल्हापूर : एक मताने १९९८ मध्ये वाजपेयी सरकार पडले, सात जागा कमी पडल्याने २००४ मध्ये भाजप सरकार स्थापन करता आले नाही; त्यामुळे एक आणि एक जागा महत्त्वाची असून, शिवसेना-भाजपच्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे प्रचार करा. आपण कमी पडलो म्हणून माझी तक्रार ‘मातोश्री’वर जाणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केले.

येथील एका हॉटेलमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, आमदार अमल महाडिक, पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजप प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे, पश्चिम महाराष्टÑ संघटनमंत्री रवी अनासपुरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, महानगर अध्यक्ष संदीप देसाई, जिल्हा संघटन मंत्री बाबा देसाई, आदी प्रमुख उपस्थित होते.

कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, राधानगरी, चंदगड, कागल विधानसभा मतदार संघनिहाय पालकमंत्री पाटील यांनी पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांना मार्गदर्शन केले.युती झाल्याने कोणी मनात संभ्रम बाळगण्याची गरज नाही. आपली दिशा स्पष्ट असून, युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना निवडून आणायचे आहे; यासाठीकार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी करावे. प्रचार करताना यंत्रणेबाबत मित्रपक्षाला तसदी न देता, त्यांच्याकडून काही अपेक्षा करू नका. स्वत:ची यंत्रणा राबवा, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, हेमंत कोलेकर, राहुल देसाई, प्रवीणसिंह सावंत, आर. डी. पाटील, अशोक देसाई, दिलीप मैत्राणी, विजय जाधव, मामा कोळवणकर, मारुती भागोजी, अशोक लोहार, अमोल पालोजी, हेमंत आराध्ये, अनिल देसाई, नगरसेवक विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे, संभाजी जाधव, किरण नकाते, विजयसिंह खाडे, जयश्री जाधव, उमा इंगळे, सविता कुंभार, गीता गुरव, भाग्यश्री शेटके उपस्थित होते.कुणाच्या भागात किती मते चेक करणारही निवडणूक युतीसाठी महत्त्वाची आहे. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी एक आणि एक जागा महत्त्वाची आहे; त्यामुळे कोल्हापुरातून संजय मंडलिक यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करावी. कोणत्याच बाबतीत आपण कमी पडता कामा नये. निवडणुकीनंतर कोणत्या भागातून किती मतदान मिळाले, याचा आढावा नगरसेवकांसह जिल्हा परिषद सदस्यांकडून घेतला जाईल, असा इशारा पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.

 

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर