शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

कोल्हापूर जिल्हा परिषदेचा परिसर चकाचक, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 10:55 AM

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी  श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी चार डंपर कचरा गोळा करण्यात आला. महात्मा गांधीजींच्या १५०व्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबर, ते २ आॅक्टोबर २0१८ या कालावधीमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’अभियान राबविले जात आहे. याअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा परिषदेचा परिसर चकाचकअधिकारी, कर्मचाऱ्यांचे श्रमदान

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी  श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी चार डंपर कचरा गोळा करण्यात आला. महात्मा गांधीजींच्या १५०व्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबर, ते २ आॅक्टोबर २0१८ या कालावधीमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’अभियान राबविले जात आहे. याअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला.पाणी व स्वच्छता विभागामार्फत आयोजित या मोहिमेमध्ये श्रमदानासाठी सर्व खातेप्रमुख आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांसह उपस्थित होते. स्वच्छता श्रमदानासाठी सर्व विभागांना जिल्हा परिषद, परिसराचे वाटप करण्यात आले होते. त्याप्रमाणे सकाळी नऊ वाजता या श्रमदानास सुरुवात करण्यात आली. या उपक्रमासाठी बांधकाम विभागाने स्वच्छता साहित्याचा पुरवठा केला.मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनीच हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेला सुरुवात केल्याने विभागप्रमुख आणि कर्मचाऱ्यांनीही हिरिरीने ही स्वच्छता मोहीम पार पाडली. जिल्हा परिषदेच्या पाठीमागील बाजू तसेच जुन्या कागलकर वाड्याजवळील सर्व कचरा या मोहिमेमध्ये गोळा करण्यात आला. याच पद्धतीने बाराही तालुक्यांमध्ये पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी पंचायत समित्यांचा परिसर स्वच्छ केला.

दर मंगळवारी श्रमदानयापुढे दर मंगळवारी सकाळी अशाच पद्धतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तेव्हा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ९ वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे.

जुन्या विहिरी, खणींमध्ये ७९८ गणेशमूर्ती विसर्जितपाणी व स्वच्छता विभागाच्यावतीने सार्वजनिक मूर्ती नदीमध्ये विसर्जित न करता त्या प्रशासनाने ठरवलेल्या जुन्या विहिरीत किंवा खणीमध्ये विसर्जित कराव्यात, असे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून, जिल्ह्यातील एकूण ७९८ सार्वजनिक आणि ३० घरगुती गणेशमूर्तींचे जुन्या विहिरींमध्ये विसर्जन करण्यात आल्याचे या विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांनी सांगितले.तालुका आणि विसर्जित सार्वजनिक मूर्तींची संख्या खालीलप्रमाणेआजरा (५१), भुदरगड (१८),चंदगड (११0),गगनबावडा (0),गडहिंग्लज (१८0), हातकणंगले (२३), कागल (७८), करवीर (६२), पन्हाळा (२८), राधानगरी (१८४), शाहूवाडी (७), शिरोळ(५७). 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर