शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिपीठ होणार पण कोणावर लादणार नाही, मंत्री हसन मुश्रीफांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 13:06 IST

हाके, टीका करताना भान बाळगा

कोल्हापूर : शक्तिपीठसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केलेली नाही. तरीही विरोध असलेल्या शेतकऱ्यांची जमीन घेणार नाही. पण, काही शेतकरी जादा दराची मागणीही करत आहेत. त्यामुळे शक्तिपीठ होणार पण तो कोणावरही लादणार नाही, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.मंत्री मुश्रीफ म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तिपीठ महामार्ग रद्दबाबत अधिसूचना काढली होती. त्यानंतर भूसंपादनाचे काम अद्याप सुरू नाही. तरीही ज्या शेतकऱ्यांचा जमीन देण्यास विरोध आहे, त्यांना सोडून जे देणार आहेत, त्यांच्याकडून घेऊन महामार्ग करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे.लक्ष्मण हाकेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना भान ठेवावे. उपमुख्यमंत्री पवार हे गेली ४० वर्षे राजकारण व समाजकारणात आहेत. अशा व्यक्तीवर टीका करणे योग्य नाही. त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाने त्यांना समज द्यावी. त्यांनी आपली पायरी ओळखून बोलावे, उगीच महायुतीत गोंधळ होईल, असे वक्तव्य करू नये.

शेतकऱ्यांचा अपमान होईल, असे कृषिमंत्र्यांनी बोलू नयेवास्तविक कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत अपमानकारक बोलू नये, याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी अनेकवेळा समज दिली आहे. आता ते यातून बोध घेतील, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

विशाळगडबाबत सर्वांनी काळजी घ्याविशाळगडबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लक्ष घातले आहे. कायदा, सुव्यवस्था चांगली राहील यासाठी सगळ्यांनी काळजी घ्यावी, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गministerमंत्रीHasan Mushrifहसन मुश्रीफManikrao Kokateमाणिकराव कोकाटे