कोल्हापूरचे शाहू छत्रपती मनोज जरांगे यांच्या भेटीस

By भारत चव्हाण | Updated: October 31, 2023 11:19 IST2023-10-31T11:18:37+5:302023-10-31T11:19:05+5:30

शाहू छत्रपती यांनी मराठा आंदोलनास यापूर्वी सक्रीय सहभाग घेतला आहे.

shahu chhatrapati of kolhapur to meet manoj jarange | कोल्हापूरचे शाहू छत्रपती मनोज जरांगे यांच्या भेटीस

कोल्हापूरचे शाहू छत्रपती मनोज जरांगे यांच्या भेटीस

भारत चव्हाण,  लोकमत न्युज नेटवर्क, कोल्हापूर : अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षण मागणीसाठी आमरण उपोषण करीत असलेल्या मनोज जिरंगे पाटील यांना भेटण्यासाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर व सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी मंगळवारी पहाटे 5.30 वाजता येथून रवाना झाले.

श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, माणिकराव मंडलिक, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, बाबा पार्टे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे हेही आहेत.

शाहू छत्रपती यांनी मराठा आंदोलनास यापूर्वी सक्रीय सहभाग घेतला आहे. मुंबई येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चात एक मराठा म्हणून सहभागी झाले होते. घटनेत दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी पहिली सूचना त्यांनी राज्य व केंद्र सरकारला केली होती.

Web Title: shahu chhatrapati of kolhapur to meet manoj jarange