शाहू छत्रपती हे माझे सर्वस्व, त्यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचे एवढे एकच उद्दिष्ट - माजी खा. संभाजीराजे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 14:02 IST2024-03-07T14:00:08+5:302024-03-07T14:02:47+5:30
लोकसभेला ‘स्वराज्य’ रिंगणाबाहेर...

शाहू छत्रपती हे माझे सर्वस्व, त्यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचे एवढे एकच उद्दिष्ट - माजी खा. संभाजीराजे
कोल्हापूर : शाहू छत्रपती हे माझे सर्वस्व आहे. त्यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचे एवढे एकच उद्दिष्ट माझ्यासमोर आहे. त्यामुळे लोकसभेला राज्यभरात कुठेही ‘स्वराज्य’ संघटना कार्यरत राहणार नसल्याचे माजी खा. संभाजीराजे यांनी बुधवारी स्पष्ट केले.
न्यू पॅलेसवरील कार्यालयात पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले, महाविकास आघाडीकडून काही गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत. परंतु, शाहू महाराज लोकसभेला उभे राहणार असून, त्यांची आणि लोकांचीही इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. ते दिल्ली गाजवतील, असा मला विश्वास आहे.