‘इंडिया’वरून लक्ष विचलित करण्यासाठीच लाठीचार्ज; शाहू छत्रपतींना वेगळीच शंका
By समीर देशपांडे | Updated: September 2, 2023 18:28 IST2023-09-02T18:28:30+5:302023-09-02T18:28:41+5:30
लाठीमार करण्याचे आदेश कोणी दिले आणि का दिले याची चौकशीही होण्याची गरज आहे.

‘इंडिया’वरून लक्ष विचलित करण्यासाठीच लाठीचार्ज; शाहू छत्रपतींना वेगळीच शंका
कोल्हापूर - एकीकडे मुंबईत ‘इंडिया’ची बैठक सुरू असते. या ठिकाणी देशभरातून विरोधी पक्षांचे नेते आलेले असतात. तर दुसरीकडे याचवेळी जालना जिल्ह्यातील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बसलेल्या आंदोलकांवर लाठीमार होताे. हा निव्वळ योगायोग कसा समजायचा? माध्यमांसह सर्वांचेच लक्ष विचलित करण्यासाठी हा लाठीचार्ज झाला का असा सवाल शाहू छत्रपती यांनी उपस्थित केला आहे.
ते म्हणाले, आंदोलक त्यांच्या पध्दतीने शांतपणे आंदोलन करत असताना अचानक असे काय घडले की लाठीमार करावा लागला आणि त्यांना हटवण्याची कार्यवाही करावी लागली. हे अजिबात योग्य नाही. निषेधार्ह आहे. लाठीमार करण्याचे आदेश कोणी दिले आणि का दिले याची चौकशीही होण्याची गरज आहे. सरकारनेच हे स्पष्ट केले पाहिजे अशीही मागणी शाहू छत्रपती यांनी केली.