कोल्हापुरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

By Admin | Updated: June 14, 2016 00:47 IST2016-06-14T00:40:54+5:302016-06-14T00:47:17+5:30

पोलिसांची कारवाई : तीन तरुणींसह दलाल, रिक्षाचालकास अटक

Sex racket exposed in Kolhapur | कोल्हापुरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

कोल्हापुरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

कोल्हापूर : कळंबा-वाशीनाका ते आपटेनगर रस्त्यावर सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास वेश्या व्यवसायासाठी तिघा तरुणींना रिक्षातून घेऊन जाणाऱ्या दलालासह रिक्षाचालकास शहर पोलिस उपअधीक्षक कार्यालयाच्या पथकाने रंगेहात पकडले. संशयित आरोपी दलाल राजू बाबूराव चव्हाण (वय ४६, रा. महादेव मंदिराशेजारी, आपटेनगर), रिक्षाचालक चंद्रकांत लक्ष्मण शिंदे (४२, रा. राजोपाध्येनगर) अशी त्यांची नावे आहेत. पीडित तरुणींमध्ये एक मुंबईची व दोन स्थानिक आहेत. त्यांच्याकडून रिक्षा, तीन मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
राजू चव्हाण हा सेक्स रॅकेट चालवीत असल्याची माहिती शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास कळंबा-वाशी नाका रोडवर पाळत ठेवली असता चव्हाण हा रिक्षातून तीन तरुणींना घेऊन जाताना दिसला. यावेळी राणे यांच्या पथकाने रिक्षाचा पाठलाग करून त्यांना रंगेहात पकडले. संशयित चव्हाण याच्याकडे चौकशी केली असता त्याने सेक्स रॅकेट चालवीत असल्याची कबुली दिली. तिघा पीडित तरुणींसह दोघांना लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात आणले. चव्हाण हा अनेक वर्षांपासून सेक्स रॅकेट चालवीत आहे. त्याच्यावर जुना राजवाडा, करवीर पोलिस ठाण्यांत यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. राजू चव्हाण याच्या घरामध्ये मुंबईतील २६ वर्षांची तरुणी राहत होती. अन्य दोघी तरुणी स्थानिक असल्याने त्या दिवसभर वेश्या व्यवसाय करून रात्री आपल्या घरी जात होत्या. त्यांच्याकडे येणाऱ्या गिऱ्हाइकांकडून चव्हाण हा दोन हजार रुपये घेत होता. त्यांतील पाचशे रुपये तरुणीला देऊन त्यांना गिऱ्हाइकाच्या स्वाधीन करीत असे. तेथून गिऱ्हाईक तिला स्वत:च्या घरी किंवा लॉजवर घेऊन जात असे. चव्हाण हा फोनवरून तरुणींशी व गिऱ्हाइकांशी संपर्क साधत असे.
तरुणींचा आक्रोश -पीडित तरुणींना लक्ष्मीपुरीच्या महिला पोलिस कक्षामध्ये बसविले होते. त्यांच्याकडून महिला पोलिस अधिकारी माहिती घेत होत्या. यावेळी वृत्तपत्रांचे छायाचित्रकार समोर दिसताच त्यांना रडू कोसळले.

Web Title: Sex racket exposed in Kolhapur