शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: बेपत्ता होऊन सात वर्षांनंतर कोर्टाच्या आदेशाने मिळतो मृत्यू दाखला, तोपर्यंत कुटुंबाची होते ससेहोलपट 

By विश्वास पाटील | Updated: March 6, 2026 17:09 IST

सरकारी पातळीवर कुणी वालीच नाही

विश्वास पाटीलकोल्हापूर : हरवलेल्या किंवा बेपत्ता झालेल्या महिला, मुली व लहान मुलांच्या बाबतीत राज्य सरकार जरुर संवेदनशील आहे; परंतु त्याव्यतिरिक्त जे लोक घरातून निघून जातात आणि पुन्हा सापडतच नाहीत त्यांच्या कुटुंबीयांचे मात्र हेलपाटे मारूनच जगणं जर्जर होऊन जाते. हे बेपत्ता लोक कोणत्याच यंत्रणेच्या खिजगिणतीतच नाहीत. सात वर्षे पूर्ण झाल्यावर न्यायालयाने आदेश दिल्यानंतरच त्यांचा मृत्यू दाखला मिळतो मगच त्यांच्या वारसांना आर्थिक व अन्य लाभ होतात; पण ही सात वर्षे त्या कुटुंबाच्या दृष्टीने मनस्तापाचीच ठरत असल्याचे अनुभव आहेत.सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांचा खून झाल्याचे सिद्ध झाले; परंतु त्यांच्या मृत्यूचा दाखला अजून मिळालेला नाही. म्हणून हा दाखला देण्याची नेमकी प्रक्रिया काय असते, हे ‘लोकमत’ने जाणून घेतले. ही प्रक्रिया बरीच वेळखाऊ आणि सामान्य माणसाला त्रास देणारी आहे.व्यक्ती बेपत्ता झाल्यास भारतीय पुरावा कायद्याच्या कलम १०८ अन्वये व्यक्ती ७ वर्षे बेपत्ता असल्यास न्यायालयात दिवाणी दावा दाखल करून व्यक्ती मृत घोषित करण्याची मागणी करावी लागते. त्यासाठी पोलिस ठाण्यात २४ तासांत केलेली नोंद, पोलिसांचे नॉट ट्रेसेबल असे प्रमाणपत्र मिळवावे लागते. त्यानंतर न्यायालय मृत्यूची नोंद करण्याचा आदेश स्थानिक स्वराज्य संस्थेला देते. मग तिथे हा दाखला मिळतो. त्यासाठी पुन्हा वर्ष-दीड वर्षाचे हेलपाटे ठरलेलेच असतात.नोंदच नाही..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानपरिषदेत राज्यात ४८२७८ महिला व १२११३ अल्पवयीन मुली हरवल्या होत्या. त्यातील ३६५८१ महिला व १०२९५ मुली सापडल्याची माहिती दिली; परंतु त्याव्यतिरिक्त इतर लोक जे बेपत्ता होतात त्यांची एकत्रित नोंद यंत्रणेकडे उपलब्ध नाही. मुले-मुली, महिला हरवली तर पोलिस खाते खडबडून जागे होते. तसे इतर लोकांच्या बाबतीत नाही.

बेपत्ता झाल्यास वर्षभर पोलिस दखलच घेत नाहीत. येईल परत म्हणत शोध घेतला जात नाही. कुटुंबातील कर्ता असेल तर सारे कुटुंबच रस्त्यावर येते. बेपत्ता दाखला मिळण्याचा सात वर्षे कालावधी हा जास्त आहे. त्या कुटुंबाची या काळात फरपट होते. तो कमी होण्याची गरज आहे. - प्रसाद देटके, वडोली-भिकेश्वर (ता.कराड) 

गृहविभागाने १० फेब्रुवारीस राजपत्र प्रसिद्ध करून पोलिसांसमवेत पंचनामा करण्याची जबाबदारी दंडाधिकारी म्हणून तहसीलदारांवर दिली आहे; परंतु हा मृत्यू दाखला देण्याच्या प्रक्रियेत कोणताच बदल झालेला नाही. - स्वप्नील पवार, तहसीलदार करवीर

English
हिंदी सारांश
Web Title : Missing Person: Family Struggles for Death Certificate After Seven Years

Web Summary : Families of missing persons face hardship. A death certificate requires a seven-year wait and court order, delaying financial aid. While authorities track missing women and children, other missing individuals lack comprehensive records, prolonging the family's ordeal.