शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

Kolhapur Crime: तोतया पोलिसांकडून सात तोळे दागिने लंपास, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने शोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 12:17 IST

मार्केट यार्ड, पारगावातील घटना, पेठ वडगावातही प्रयत्न

कोल्हापूर/पारगाव : दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गुप्तहेर खात्यातील पोलिस असल्याची बतावणी करून कोल्हापुरातील राजर्षी शाहू मार्केट यार्डजवळ आणि हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव येथून दोघांकडील सात तोळे दागिने लंपास केले. या दोन्ही घटना सोमवारी (दि. ७) सकाळी दहा ते दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडल्या. याबाबत शाहूपुरी आणि पेठ वडगाव पोलिस ठाण्यात फिर्यादी दाखल झाल्या असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने भामट्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.कापड व्यापारी चंद्रप्रकाश उगमराज मांडोत (वय ६१, रा. टाकाळा चौक, कोल्हापूर) हे सोमवारी सकाळी राजर्षी शाहू मार्केट यार्डात निघाले होते. कमानीजवळ काही अंतरावर त्यांना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडवले. ‘आम्ही पोलिस आहे. इथे लूटमारीचे प्रकार घडतात. तुमच्या अंगावरील दागिने काढून ठेवा,’ असे सांगून त्यांना गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची चेन आणि एक तोळ्याची अंगठी काढण्यास सांगितले. हातचलाखी करून दगड बांधलेली कागदाची पुडी मांडोत यांना देऊन दागिन्यांची पुडी घेऊन ते निघून गेले. काही वेळाने कागदाची पुडी सोडून पाहिल्यानंतर मांडोत यांना फसवणुकीचा प्रकार लक्षात आला. याबाबत त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.पारगावात चार तोळ्यांवर डल्लानवे पारगाव येथील महादेव गणपती पवार (वय ६६) हे वारणानगर येथील एका खासगी कंपनीत काम करून घरी निघाले होते. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पाडळी रोड येथील झेंडा चौकात त्यांना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडवले. “आम्ही सीआयडीचे पोलिस आहे. चोरीच्या घटना घडू नयेत म्हणून आम्ही खबरदारी घेत असतो. तुम्ही अंगावर एवढे सोने घालून कशाला फिरता?” असे म्हणत त्यांनी अंगावरील सोने काढून रुमालात बांधण्यास सांगितले. 

दुचाकीच्या सीटवर रुमाल ठेवून पवार यांनी तीन तोळ्यांचा गोफ आणि एक तोळ्याची अंगठी रुमालात ठेवली. दोन्ही भामट्यांनी पवार यांना बोलण्यात गुंतवून रुमालात दुसरी कागदी पुडी ठेवून दागिने काढून घेतले. घरात गेल्यानंतर त्यांना रुमालातील पुडीत बनावट दागिने असल्याचे दिसले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पेठ वडगाव पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. दरम्यान, पेठ वडगाव येथेही पोलिस असल्याची बतावणी करून लूट करण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोन्ही घटनांमध्ये एकच दुचाकीमार्केट यार्ड आणि नवे पारगाव येथील दोन्ही घटनांमध्ये काळ्या रंगाची दुचाकी दिसत आहे. दोन्ही संशयित अंदाजे २२ ते २५ वयोगटातील आहेत. दुचाकी चालवणाऱ्याने हेल्मेट घातले होते. त्याच्या अंगात निळ्या रंगाचा शर्ट आणि पँट होती. मागे बसलेल्या तरुणाच्या डोक्यावर राखाडी रंगाची टोपी होती. त्याच्या अंगात पिवळ्या रंगाचा शर्ट आणि पँट होती, अशी माहिती फिर्यादींनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस