शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

कागल-सातारा महामार्गाला सर्व्हिस रोड, रखडलेल्या कामाला मंजुरी; अपघातांचा धोका टळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 16:03 IST

सर्वाधिक वर्दळ आणि सर्वाधिक खराब रस्ता

उद्धव गोडसेकोल्हापूर : पुणे ते बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कागल ते सातारा (शेंद्रे) दरम्यान १३३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे विस्तारीकरण गतिमान झाले आहे. संपूर्ण मार्गालगत सर्व्हिस रोड केले जाणार आहेत. यामुळे स्थानिकांची सोय होणार असून, अपघातांचा धोका टळणार आहे.देशातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गांपैकी एक असलेल्या पुणे ते बंगळुरू महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम केवळ सातारा ते कागल दरम्यान रखडले होते. गेल्या सहा वर्षांपासून रखडलेल्या कामाला अखेर गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मंजुरी देऊन चार हजार ४७८ कोटींचे टेंडर काढले. त्यानंतर कामाला सुरुवात झाली आहे.यापूर्वीच्या चारपदरी महामार्गावर अनेक त्रुटी आहेत. कागल ते सातारादरम्यान अनेक ठिकाणी सर्व्हिस रोड नाहीत. अवजड वाहनांसाठी स्वतंत्र थांबे नाहीत. बसस्टॉपची व्यवस्था नाही. सर्व्हिस रोड नसल्यामुळे अनेक ठिकाणी स्थानिकांकडून महामार्गावर उलट्या दिशेने वाहतूक केली जात होती. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते.महामार्गाच्या विस्तारीकरणात सर्व्हिस रोड तयार करण्यास प्राधान्य दिले आहे. आराखड्यानुसार १६२ किलोमीटरचे सर्व्हिस रोड होणार आहेत. शिवाय महामार्गालगतच्या गावांना जोडणारे रस्ते, बसथांबे, अवजड वाहनांसाठी स्वतंत्र थांबे, पादचारी भुयारी मार्ग, उड्डाणपूल, पाणी वाहून जाणाऱ्या मोरी केल्या जाणार आहेत. यामुळे महामार्गावरील वाहतूक विनाअडथळा आणि अधिक गतिमान होणार असून, स्थानिकांचीही सोय होणार आहे. असल्याची माहिती महामार्ग विकास महामंडळाचे अधिकारी वसंत पंदरकर यांनी दिली. 

सर्वाधिक वर्दळ आणि सर्वाधिक खराब रस्ताकागल ते सातारा या महामार्गावर २४ तासांत सुमारे ७० ते ८० हजार वाहने धावतात. औद्योगिक वसाहती, मोठी गावे, राज्य मार्ग, जिल्हा मार्ग या महामार्गाला जोडले आहेत. त्यामुळे वाहनांची प्रचंड वर्दळ असते. असे असूनही या मार्गाचे विस्तारीकरण अनेक वर्षे रखडले होते. आता तरी महामार्गाचे काम दर्जेदार व्हावे, अशी वाहनधारकांची अपेक्षा आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatara areaसातारा परिसरhighwayमहामार्ग