शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

कळंबा कारागृहातील प्रकाराची वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 19:20 IST

Jail Crimenews Kolhapur- कळंबा मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने त्याची गांभीर्याने दखल घेत शुक्रवारी अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह) सुनील रामानंद हे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कारागृहात सापडलेल्या गांजा, मोबाईल आदी वस्तूंबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू झाली. गुरुवारी सकाळी जुना राजवाडा पोलिसांनी कारागृहात जाऊन चौकशी केली.

ठळक मुद्देकळंबा कारागृहातील प्रकाराची वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरूपोलिसांतील कर्मचाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने त्याची गांभीर्याने दखल घेत शुक्रवारी अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह) सुनील रामानंद हे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कारागृहात सापडलेल्या गांजा, मोबाईल आदी वस्तूंबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू झाली. गुरुवारी सकाळी जुना राजवाडा पोलिसांनी कारागृहात जाऊन चौकशी केली.सोमवारी मध्यरात्री चारचाकी वाहनातून आलेल्या दोन तरुणांनी तीन गठ्ठे कारागृहातील संरक्षण भिंतीवरून आत फेकल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळले. हे गठ्ठे मंगळवारी पहाटे कारागृहातील सुरक्षा रक्षकास मिळाले. गठ्ठ्यामध्ये पाऊण किलो गांजा, नवे दहा मोबाईल संच, पेनड्राईव्ह, मोबाईल कॉड आदी साहित्य सापडले होते.

कारागृहाची सुरक्षा व्यवस्था भेदल्याने खळबळ उडाली. याची वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेतली असून चौकशी सुरू झाली. चौकशीसाठी अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह) सुनील रामानंद हे शुक्रवारी कोल्हापुरात येत असून ते कारागृहाला भेट देऊन चौकशी करणार आहेत.घटनेचे गांभीर्य ओळखून कारागृहातील सर्व बराकची झडती घेतली. दीड महिन्यात दुसऱ्यांदा प्रकार घडल्याने ड्युटीवरील कर्मचाऱ्यांची चौकशी केली. पॅरोलवरील कैदी कारागृहात परतत आहेत. त्यातूनच प्रकार घडल्याची शक्यता कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :jailतुरुंगCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर