प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री, कोल्हापूर जिल्ह्यातील ३४ मेडिकल्सचे परवाने निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 18:22 IST2025-01-29T18:21:01+5:302025-01-29T18:22:32+5:30
कोल्हापूर : प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधी विक्रीवर बंदी आहे; परंतु या नियमांचे उल्लंघन करून अनेक विक्रेते औषध विक्री करतात. कोल्हापूर जिल्ह्यातील ...

संग्रहित छाया
कोल्हापूर : प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधी विक्रीवर बंदी आहे; परंतु या नियमांचे उल्लंघन करून अनेक विक्रेते औषध विक्री करतात. कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कारवाई करत २०२३-२४ या वर्षात प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री करणाऱ्या ३३ मेडिकल्सचे परवाने वर्षभरात निलंबित केले आहेत.
प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधी देण्यास मनाई
डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री करण्यास विक्रेत्यांना कायद्याने मनाई आहे. अशी औषधे खाल्ल्याने रुग्णांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती असते. काही औषधांच्या साइड इफेक्टमुळे गंभीर परिणाम देखील होण्याची शक्यता असते. अन्न व औषध प्रशासन वेळोवेळी औषध विक्रेत्यांकडील व्यवहारांची, कागदपत्रांची तपासणी करते.
वर्षभरात ३३ परवाने निलंबित
विभागाने प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री करणाऱ्या ३३ मेडिकल्सचे परवाने २०२३-२४ या वर्षात निलंबित केले आहेत.
- एससीएन जारी-४४
- परवाना निलंबित-३३ (०९-२०२५)
- परवाने रद्द-०९ (०२-२०२५)
- परवाना जमा-०२ (०१-२०२५)
अन्न व औषध विभागामार्फत मेडिकल दुकानाची नियमित तपासणी केली जाते. पडताळणीत विनाप्रिस्क्रिप्शन वा औषध खरेदी-विक्री बिलांत अनियमितता, तसेच इतर नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कारवाई केले जाते. -अश्विन ठाकरे, सहायक आयुक्त (औषध), कोल्हापूर