राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी श्रद्धा कुंभार हिची निवड 

By सचिन भोसले | Updated: December 2, 2023 19:39 IST2023-12-02T19:39:25+5:302023-12-02T19:39:54+5:30

मोहालीतील चंदीगड विद्यापीठात होणाऱ्या दक्षिण पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय कुस्ती अजिकंयपद स्पर्धा ३ ते ५ डिसेंबर दरम्यान होत आहे.

Selection of Shraddha Kumhar for National Wrestling Tournament |  राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी श्रद्धा कुंभार हिची निवड 

 राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी श्रद्धा कुंभार हिची निवड 

कोल्हापूर : मोहालीतील चंदीगड विद्यापीठात होणाऱ्या दक्षिण पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय कुस्ती अजिकंयपद स्पर्धा ३ ते ५ डिसेंबर दरम्यान होत आहे. या स्पर्धेसाठी श्रद्धा कुंभार हिची ५७ किलो वजनीगटात शिवाजी विद्यापीठाच्या संघात निवड झाली. तिची ही निवड चंदीगड विद्यापीठात झालेल्या नार्थ इस्ट व साऊथ वेस्ट स्पर्धेतील श्रद्धाने चमकदार कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर तिची अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय कुस्ती स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली.

श्रद्धा छत्रपती शहाजी कॉलेजची विद्यार्थीनी असून तिला राज्याचे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा आडसुळ, क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य अभय देशपांडे, यल्लाप्पा गाडीवडर, अरुण पाटील, धर्मराज कुंभार, प्रशांत पाटील यांचे प्रोत्साहन, तर शासकीय प्रशिक्षक प्रविण कोंडवळे, कृष्णात पाटील, साताप्पा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
 

Web Title: Selection of Shraddha Kumhar for National Wrestling Tournament