प्रजासत्ताक दिन परेडसाठी कोल्हापूरच्या करण गावडेची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 17:19 IST2023-01-23T16:39:11+5:302023-01-23T17:19:58+5:30

सध्या पुण्यातील स. प. महाविद्यालयातून तो बीसीएसचे शिक्षण घेत आहे

Selection of Karan Gawde of Kolhapur for the Republic Day Parade | प्रजासत्ताक दिन परेडसाठी कोल्हापूरच्या करण गावडेची निवड

प्रजासत्ताक दिन परेडसाठी कोल्हापूरच्या करण गावडेची निवड

कोल्हापूर : दिल्लीत २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेडसाठी कोल्हापूरच्या करण नंदकुमार गावडे याची पुण्याच्या तीन महाराष्ट्र एनसीसी एअर स्कॉर्डनमार्फत निवड झाली आहे.

करणचे शालेय शिक्षण कोल्हापूरच्या सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये झाले आहे. तो विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. सध्या पुण्यातील स. प. महाविद्यालयातून तो बीसीएसचे शिक्षण घेत आहे. त्याचे वडील नंदकुमार ईश्वर गावडे शाहूपुरी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.

करणचे मूळ गाव चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी असून, तो सध्या कसबा बावडा येथील पोलिस लाइन येथे राहत आहे. करणला त्याचे आजोबा ईश्वर गावडे, आई नम्रता, मामा जानबा बोलके, रामचंद्र गावडे यांचे प्रोत्साहन आणि सेंट झेवियर्सचे शिक्षक अँथोनी यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Selection of Karan Gawde of Kolhapur for the Republic Day Parade