चोरी प्रकरणातील साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:25 IST2021-07-30T04:25:53+5:302021-07-30T04:25:53+5:30

इचलकरंजी : शहापूर पोलिसांनी चोरी प्रकरणात अटक केलेल्या संशयितास शिवाजीनगर पोलिसांनी वर्ग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडे नव्याने स्थापन ...

Seizure of Rs 6.5 lakh in theft case | चोरी प्रकरणातील साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

चोरी प्रकरणातील साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

इचलकरंजी : शहापूर पोलिसांनी चोरी प्रकरणात अटक केलेल्या संशयितास शिवाजीनगर पोलिसांनी वर्ग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडे नव्याने स्थापन झालेल्या डीबी पथकाने अधिक तपास करून आणखीन चौघांना ताब्यात घेतले. तसेच सुमारे सहा लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

कोरोची (ता.हातकणंगले) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार

नागेश हणमंत शिंदे (वय २७) यास शहापूर पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून चार चाकी व दोन मोटारसायकली जप्त केल्या. त्यातील एक शिवाजीनगर हद्दीतील असल्याने तो गुन्हा वर्ग करून त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता नवीन डीबी पथकाने चार संशयितांना ताब्यात घेतले. त्यानुसार सहा मोटारसायकली, दोन लॅपटॉप, ३२ मोबाइल असा सहा लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आठवडी बाजारातून भुरट्या चोरट्यांकडून मोबाइल चोरीचे प्रमाण वाढले आहे, तर चंदूर येथून झालेली घरफोडी अजूनही उघडकीस आली नाही. त्यामुळे नवीन डीबी पथकाला गुन्हे उघडकीस आणण्याबाबत अनेक आव्हाने आहेत.

चौकट पोलिसास धक्का प्रकरणाचा उलगडा नाही

डेक्कन परिसरात वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई सुरू होती. त्यावेळी एका मोपेडला वाहतूक शाखेच्या पोलिसाने थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पोलिसास धक्का देत तेथून पलायन केले. त्यावेळी एक पोलीस जखमी झाला होता. त्या घटनेचा उलगडाही अद्याप झाला नाही.

Web Title: Seizure of Rs 6.5 lakh in theft case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.