मिळालेल्या संधीचं सोनं करा : देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST2021-06-09T04:30:39+5:302021-06-09T04:30:39+5:30
गारगोटी: आमदार प्रकाश आबिटकर यांनी सामान्य कार्यकर्त्यांचे सदैव हित जोपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पदे दिली आहेत. आक्काताई नलवडे यांची सभापतीपदी ...

मिळालेल्या संधीचं सोनं करा : देसाई
गारगोटी:
आमदार प्रकाश आबिटकर यांनी सामान्य कार्यकर्त्यांचे सदैव हित जोपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पदे दिली आहेत. आक्काताई नलवडे यांची सभापतीपदी निवड करून त्यांच्यावर तालुक्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. त्यांनी आगामी काळात संधीचं सोनं करून तालुक्याचा कायापालट करावा, असे आवाहन जि.प.चे माजी उपाध्यक्ष बी. एस. देसाई यांनी केले.
नूतन सभापती आक्काताई नलवडे यांची सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे होते. प्राचार्य अर्जुन आबिटकर, गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, जि. प. सदस्या रोहिणी आबिटकर प्रमुख उपस्थित होत्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नूतन सभापती आक्काताई प्रवीण नलवडे यांचा सत्कार करण्यात आला. नलवडे म्हणाल्या, आमदार प्रकाश आबिटकर यांनी माझी निवड करून माझ्यावर टाकलेला विश्वास आगामी काळात सार्थ ठरवू व तालुक्यात वेगळी ओळख निर्माण करणार असल्याचे सांगितले.
स्वागत व प्रास्ताविक दत्तात्रय उगले यांनी केले. जिल्हा शिवसेनाप्रमुख विजय देवणे, जिल्हा उपप्रमुख प्रकाश पाटील, पं. स. सदस्य अजित देसाई, प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी जि. प. सदस्या रोहिणी आबिटकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, उपसभापती सुनील निंबाळकर, पं. स. सदस्य अजित देसाई, माजी सभापती श्रीमती कीर्ती देसाई, सदस्या स्नेहल परीट, सरिता वरंडेकर, विजयालक्ष्मी आबिटकर, माजी सभापती बाबा नांदेकर, तालुका प्रमुख अविनाश शिंदे, जिल्हा संघाचे सदस्य बी. डी. भोपळे, कॉन्ट्रॅक्टर संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश नलवडे, प्रवीण नलवडे, कल्याणराव निकम, सरपंच अशोक भांदीगरे, प्रकाश कोराणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अजित देसाई यांनी आभार मानले.
फोटो ओळ
आक्काताई नलवडे यांची सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना बी. एस. देसाई, विजय देवणे, नंदकुमार ढेंगे, दत्ताजीराव उगले, बाबा नांदेकर, स्नेहल परीट, कीर्ती देसाई आदी.